Delhi Violence : पाकिस्तान्यांनो या, तुम्हाला भारताचं नागरिकत्व देतो म्हणत BSF जवानाचं घर पेटवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 17:00 IST2020-02-28T16:56:12+5:302020-02-28T17:00:22+5:30
आंदोलकांनी घराबाहेर असलेल्या गाड्यासुद्धा पेटवून देण्यात आल्या होत्या...

Delhi Violence : पाकिस्तान्यांनो या, तुम्हाला भारताचं नागरिकत्व देतो म्हणत BSF जवानाचं घर पेटवलं
नवी दिल्लीः देशाची राजनाधी असलेल्या दिल्लीमधल्या उत्तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार पसरलेला आहे. त्यानंतर आता आंदोलकांनी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF)च्या जवानाच्या घरांवर निशाणा साधला आहे. 25 फेब्रुवारीच्या दुपारी खजुरी भागातील एका जवानाच्या घरात तोडफोड अन् जाळपोळ करण्यात आली. खजुरी खास भागातील एका घरावर नेमप्लेटमध्ये बीएसएफ जवानाचं नावं होतं. घर नंबर 76 बीएसएफ हे मोहम्मद अनिस यांचं आहे आणि त्यावर बीएसएफच्या प्रतीकाचं चिन्हदेखील आहे.
विशेष म्हणजे घराबाहेर असलेल्या गाड्यासुद्धा पेटवून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर जमावानं त्यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच हिंसक झालेल्या जमावानं पाकिस्तान्यांनो या, तुम्हाला भारताचं नागरिकत्व देतो, असं म्हणत अनिसच्या घराच्या दिशेनं सिलिंडरही फेकला. अनिस यांनी पॅरामिलिटरी फोर्समधून आपल्या करिअरला 2013मध्ये सुरुवात केली. जवळपास 3 वर्षं जम्मू-काश्मीर सेवा देत होते. अनिसबरोबर 55 वर्षांचे वडील मोहम्मद मुनीस, 59 वर्षीय काका मोहम्मद अहमद आणि 18 वर्षीय चुलत भाऊ घरात होता. त्यानंतर लागलीत ते सगळे घराबाहेर पडले आणि पॅरामिलिटरी फोर्सनं त्यांची मदत केली.
कोणताही शेजारी हल्ल्यात सहभागी नाही
अनिसच्या घरात दोन लग्न होणार होती. अनिस स्वतःही पुढच्या महिन्यात लग्न करणार होता. आगीत आयुष्याची जमा-पुंजी, सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू जळून खाक झाल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. आम्ही दर महिन्याना पैसे साठवून दागिने खरेदी केले होते. तसेल लग्नासाठी 3 लाख रुपयांपर्यंतची रोख रक्कम जमवली होती. खजुरी खास हा हिंदूबहुल क्षेत्र आहे. विशेष म्हणजे अनिसच्या हिंदू असलेल्या शेजाऱ्यांनाही जमावाला माघारी फिरण्यास सांगितलं होतं. त्यांनीसुद्धा या हिंसेला विरोध केला होता.