Delhi Violence : हिंसाचार करणाऱ्यांना दिसता क्षणीच गोळ्या घाला; सरकारचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 10:43 PM2020-02-25T22:43:55+5:302020-02-25T23:22:05+5:30
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. या हिंसाचारामुळे आतपर्यंत 13 जणांचा ...
नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. या हिंसाचारामुळे आतपर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 200 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. या सर्व प्रकरणानंतर केंद्र सरकारने दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे.
#Correction Shoot at sight orders remain, earlier report of it being lifted was incorrect. pic.twitter.com/DSoyATVtdz
— ANI (@ANI) February 25, 2020
दिल्लीमधील हिंसाचारग्रस्त भागातील सर्व शाळा आणि कॉलेज उद्या बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच उद्या होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलण्यात येणार असल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले आहे.
Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia: Schools will remain closed tomorrow also in violence-affected North East district. All home examinations have been postponed. Central Board of Secondary Education (CBSE) has been requested to postpone tomorrow's board exams. (file pic) pic.twitter.com/WhqGeE5ywa
— ANI (@ANI) February 25, 2020
दिल्लीतील काही भागांमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात सोमवारी तब्बल 37 पोलीस गंभीर जखमी झाले होते. तर पाच जणांचा मृत्यू झाला होता. मात्र मंगळवारी मृतांचा आकडा दहावर पोहचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 जण जखमी झाले असून जीटीबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळी देखील अनेक आंदोलक हे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. आंदोलकांकडून पाच दुचाकी पेटवून देण्यात आल्या व दगडफेक देखील करण्यात आली होती.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत हिंसाचार रोखण्यासाठी सर्वपक्षीय मिळून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
भजनपुरा, मौजपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा यामध्ये मृत्यू झाला. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधावरुन दिल्लीत सोमवारी (24 फेब्रुवारी) तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सीएए विरोधी आंदोलनात पुन्हा दगडफेक करण्यात आली असून यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
अमेरिका भारताला देणार '4G' सुरक्षा कवच; जाणून घ्या, काय आहे हे अस्त्र!
Donald Trump's India Visit : ट्रम्प यांच्या लेकीची शेरवानी 'या' मराठी डिझायनरने बनवली, पण...
Donald Trump Visit Live: भारत अमेरिकेतील संरक्षण करारावर शिक्तामोर्तब, ट्रम्प आणि मोदींची घोषणा
धक्कादायक! तब्बल 12 तास हायवेवर पडून असलेला मृतदेह हजारो गाड्यांनी चिरडला अन्...