Delhi Violence : दिल्ली हिंसाचाराबाबत पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 02:46 PM2020-02-26T14:46:30+5:302020-02-26T14:51:37+5:30
सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला.
नवी दिल्ली - दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह 20 जणांचा बळी गेला आहे. तसेच 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली हिंसाचाराबाबत एक ट्विट केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिल्लीकरांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी (26 फेब्रुवारी) मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. तसेच पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे.
Had an extensive review on the situation prevailing in various parts of Delhi. Police and other agencies are working on the ground to ensure peace and normalcy.
— Narendra Modi (@narendramodi) February 26, 2020
'शांतता आणि सुसंवाद राखणे ही आपली जबाबदारी आहे. मी दिल्लीच्या माझ्या भावांना आणि बहिणींना आवाहन करतो की, त्यांनी कायम शांतता आणि बंधुता जपावी. दिल्ली शहर शांत राहावं आणि लवकरात लवकर पूर्वपदावर यावं हे जास्त महत्त्वाचं आहे' असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरा उत्तर-पूर्व दिल्लीत घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर सीलमपूरमध्ये उत्तर-पूर्वचे डीसीपी वेद प्रकाश सुर्या यांच्या कार्यालयाबैठक घेतली. दिल्लीतील परिस्थितीवर डोवाल लक्ष ठेवून आहेत. डोवाल आणि अन्य अधिकाऱ्यांनी मौजपूर, जाफराबाद, गोकुलपुरी येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.
Peace and harmony are central to our ethos. I appeal to my sisters and brothers of Delhi to maintain peace and brotherhood at all times. It is important that there is calm and normalcy is restored at the earliest.
— Narendra Modi (@narendramodi) February 26, 2020
दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत हिंसाचार रोखण्यासाठी सर्वपक्षीय मिळून प्रयत्न करू, असे सांगितले.
Delhi Violence:दिल्लीतील हिंसाचार पूर्वनियोजित, अमित शाह यांनी राजीनामा द्यावा - सोनिया गांधी https://t.co/JggQ2Q5xEy
— Lokmat (@MiLOKMAT) February 26, 2020
दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगळीवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. दिल्लीत दंगल उसळल्यानंतर 72 तासांपर्यंत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक कारवाई करणे टाळले. दिल्लीत झालेला हिंसाचार आणि सध्याच्या परिस्थितीसाठी गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. त्यांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.
Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यूhttps://t.co/Fr92NuRcoy#delhivoilence#DelhiBurning
— Lokmat (@MiLOKMAT) February 26, 2020
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधातील आंदोलनांना हिंसक वळण लागून दिल्लीत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीत दिल्लीती सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू
Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण
Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली
Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'