आधीच ठरला होता दिल्ली दंगलीचा प्लॅन? पीएफआय, खुरासान मॉड्युलवर संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 03:32 PM2020-03-09T15:32:31+5:302020-03-09T15:34:29+5:30

delhi violence News : आयएसशी संबंधित काश्मिरी जोडप्याला झालेली अटक आणि आता पीएफआयचा सदस्य असलेल्या दानिशला करण्यात आलेल्या अटकेनंतर या दंगलीमागील मोठ्या कारस्थानाबाबत संकेत मिळू लागले आहेत.

delhi violence : PFI, Khurasan module :Delhi riots was Already planned? BKP | आधीच ठरला होता दिल्ली दंगलीचा प्लॅन? पीएफआय, खुरासान मॉड्युलवर संशय

आधीच ठरला होता दिल्ली दंगलीचा प्लॅन? पीएफआय, खुरासान मॉड्युलवर संशय

Next

नवी दिल्ली - फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीमध्ये अनेकांचा बळी गेला होता. आता या दंगलीबाबतची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. आयएसशी संबंधित काश्मिरी जोडप्याला झालेली अटक आणि आता पीएफआयचा सदस्य असलेल्या दानिशला करण्यात आलेल्या अटकेनंतर या दंगलीमागील मोठ्या कारस्थानाबाबत संकेत मिळू लागले आहेत. गेल्या दोन दिवसात झालेली संशयितांची धरपकड आणि पीएफआय तसेच खुरासान मॉड्युलचे नाव समोर येऊ लागल्याने दिल्लीतील दंगलीचा प्लॅन आधीच ठरला होता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दिल्लीतील जमिया परिसरातून अटक करण्यात आलेल्या जहांबेज शामी आणि हीना यांचे आयएसच्या खुरासान मॉड्युलशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ते सक्रिय होते, तसेच सीएए, सरकार आणि एका समुदायाविरोधात ते लोकांना भडकवत होते, असा आरोप आहे. तर पीएफआयशी संबंधित असलेला दानिश सीएएविरोधी आंदोलनांदरम्यान खोटी माहिती पसरवून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत असे, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, या तिघांना झालेल्या अटकेनंतर गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पाकिस्तानची कुख्यात गुप्तहेर संघटना आयएसआयच्या इशाऱ्यावरून तर दिल्लीत दंगल भडकवण्यात आली नाही ना, याचा शोध घेतला जात आहे. आयएसआयएसच्या खुरासान मॉड्युलला पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयनेच उभे केले होते. रविवारी जामियानगर परिसरातून ज्या दाम्पत्यास अटक करण्यात आली होती.  ते याच संघटनेशी संबंधित होते.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पकडला गेलेला दहशतवादी जहांबेज सामी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग हे दोघेही सोशल मिडीयावर कमालीचे सक्रीय आहेत. दोघांचीही अनेक प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या नावाने खाती आहेत. या खात्यांद्वारे भारतीय मुसलमानांना एकजूट करून आणि सरकारविरोधात सीएएवरून आंदोलन भडकविण्याचे काम सुरू होते. 

सामीच्या सायबरस्पेसमध्ये संशयस्पद हालचाली पाहून स्पेशल सेलने त्याच्यावर मागिल महिनाभरापासून नजर ठेवली होती. याशिवाय आयबीनेही दोघांच्याबाबतीत गुप्त माहिती दिली होती. चौकशीमध्ये सामीने सांगितले की, मुस्लिम बहुल भागात जाऊन लोकांना भडकविण्याचे काम करत होतो. 

संबंधित बातम्या

Delhi Violence : आयबी अधिकाऱ्याची हत्या ताहिर हुसैनच्या भावाकडून? पोलिसांकडून शोध सुरू

...म्हणून मोदी-शहा यांच्या मौनामुळे सरकारच्या हेतूबद्दल संशय वाढत गेला

दिल्लीतील हिंसा सुनियोजित अन् एकतर्फी; अल्पसंख्यांक आयोगाचा धक्कादायक खुलासा

आयएसकेपीने त्यांच्यावर मुस्लिम तरुणांना संघटनेमध्ये भरती करण्याची जबाबदारी दिली होती. त्यांना याद्वारे मोठ्या दहशतवादी हल्ल्याला यशस्वी करायचे होते. सामी शाहीन बाग आणि दिल्लीतील अन्य ठिकाणी जाऊन त्यांना हे भारत सरकार हटवायचे असल्याचे सांगत होता.

Web Title: delhi violence : PFI, Khurasan module :Delhi riots was Already planned? BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.