Delhi Violence : आग का क्या है, पल दो पल मे लगती है..., राहत इंदौरींचा भावुक शेर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 09:49 AM2020-02-27T09:49:54+5:302020-02-27T09:53:25+5:30
अशा शब्दात राहत इंदौरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच
नवी दिल्ली - सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह 34 जणांचा बळी गेला आहे. तसेच 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणानंतर देशभरातून हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे. लेखक व गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता, उर्दू शायर आणि गीतकार डॉ. राहत इंदौरी यांनीही दोन लाईन शेरमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत हिंसाचार रोखण्यासाठी सर्वपक्षीय मिळून प्रयत्न करू, असे सांगितले होते.
या हिंसाचारानंतर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग यांनी शांततेचं आवाहन केलं होतं. रोहित शर्मानेही भावनिक पोस्ट लिहिली आहे. तर जावेद अख्दर यांनीही ट्विट करुन संताप व्यक्त केला होता. जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटमध्ये कपिल मिश्रावर निशाणा साधला होता. सगळे कपिम मिश्रा बाहेर येत असल्याचे जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं. तसेच, प्रसिद्ध उर्दू शायर आणि गीतकार यांनीही दोन लाईनीत दिल्लीतील हिंसाचाऱ्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
आग का क्या है पल दो पल में लगती है,
बुझते बुझते एक ज़माना लगता है...
अशा शब्दात राहत इंदौरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, दुसऱ्या ट्विटमधूनही त्यांनी दंगेखोरांना समाजावण्याच प्रयत्न केला आहे.
आग का क्या है पल दो पल में लगती है,
— Dr. Rahat Indori (@rahatindori) February 25, 2020
बुझते बुझते एक ज़माना लगता है.....#KaifBhopali
Ye log paanv nahi, zehan se apaahij hai.n,
— Dr. Rahat Indori (@rahatindori) February 25, 2020
Udhar chalenge jidhar rehnuma chalaata hai ...... pic.twitter.com/7XnjuzEh6T
राहत इंदौरी यांनी यांनी वारिस पठाण यांच्या तुम 100 करोड और हम 15 करोड म्हटलेल्या वक्तव्यावरही भावना व्यक्त केल्या होत्या.
नफरत का बाज़ार ना बन, फूल खिला तलवार ना बन....
रिश्ता रिश्ता लिख मंज़िल, रस्ता बन दीवार ना बन....