Delhi Violence: पोलिसांवर पिस्तुल रोखून ८ राऊंड फायर करणाऱ्या शाहरुखला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 01:31 PM2020-03-03T13:31:11+5:302020-03-03T13:55:59+5:30

व्हिडीओ व्हायरल होताच शाहरुख कुटुंबासोबत झाला होता फरार

Delhi Violence shooter Shahrukh who pointed gun at police arrested from Shamli | Delhi Violence: पोलिसांवर पिस्तुल रोखून ८ राऊंड फायर करणाऱ्या शाहरुखला अटक

Delhi Violence: पोलिसांवर पिस्तुल रोखून ८ राऊंड फायर करणाऱ्या शाहरुखला अटक

Next
ठळक मुद्देशाहरुखला उत्तर प्रदेशमधल्या शामलीमधून अटकपोलिसावर पिस्तुल रोखत आठ राऊंड केल्या होत्या फायर व्हिडीओ व्हायरल होताच शाहरुख झाला होता फरार

नवी दिल्लीदिल्लीत हिंसाचार सुरू असताना पोलिसांवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला अटक करण्यात आली आहे. दिल्लीतल्या हिंसाचारादरम्यान शाहरुखचा फोटो व्हायरल झाला होता. त्याला अटक करण्याची मागणी सातत्यानं केली जात होती. अखेर आज त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. उत्तर प्रदेशच्या शामलीमधून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शाहरुखनं पोलिसांच्या दिशेनं पिस्तुलच रोखलं नव्हतं, तर त्यानं आठ राऊंड फायरदेखील केल्या होत्या. अटकेपासून वाचण्यासाठी तो फरार झाला होता. 




दिल्लीतल्या जाफराबादमध्ये हिंसाचार सुरू असताना मोहम्मद शाहरुखनं पोलीस हवालदार दीपक दहिया यांच्यावर पिस्तुल रोखलं होतं. शाहरुखनं आठ राऊंड फायरदेखील केल्या होत्या. शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी शाहरुखचा शोध सुरू केला. मात्र तो त्याच्या कुटुंबासोबत फरार झाला. पोलिसांनी आज त्याला शामलीमधून ताब्यात घेतलं. आता त्याला दिल्लीला आणलं जात असून थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन पोलीस या संदर्भातली माहिती देणार आहेत. 




शाहरुख दिल्लीमधल्या उस्मानपूरचा रहिवासी आहे. शाहरुखसोबत त्याचं कुटुंबदेखील फरार झालं. त्याच्या कुटुंबात आई, वडील आणि एक मोठा भाऊ आहे. शाहरुखला अटक करण्यात यश आलं असलं तरी अद्याप त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांचा ठावठिकाणा सापडलेला नाही. शाहरुखचे वडील साबिर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अमली पदार्थ विक्रेत्यांशी संबंध असल्यानं त्यांना एकदा तुरुंगवासदेखील घडला आहे. 

Web Title: Delhi Violence shooter Shahrukh who pointed gun at police arrested from Shamli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.