दिल्लीच्या मतदारांनी केजरीवालांना दिला "जोर का झटका"
By admin | Published: April 13, 2017 12:33 PM2017-04-13T12:33:21+5:302017-04-13T12:56:06+5:30
पंजाब, गोव्या पाठोपाठ दिल्लीमध्येही मतदारांनी आम आदमी पक्षाला जोरदार झटका दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - पंजाब, गोव्या पाठोपाठ दिल्लीमध्येही मतदारांनी आम आदमी पक्षाला जोरदार झटका दिला आहे. दिल्लीच्या राजौरी गार्डन विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. राजौरी गार्डनमधून भाजपा-शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार मनजींदर सिंग सीरसा यांनी 14,652 मतांनी विजय मिळवला. आपचा उमेदवार थेट तिस-या क्रमांकावर फेकला गेला.
दिल्ली आम आदमी पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. आगामी दिल्ली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेला पराभव अरविंद केजरीवाल यांच्यासाठी एक धक्का आहे. काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी चंडेला दुस-या स्थानावर तर, आप उमेदवार हरजीत सिंग तिस-या स्थानावर राहिले.
पश्चिम दिल्लीतील या मतदारसंघात 9 एप्रिलला पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. जवळपास 47 टक्के मतदान झाले होते. पंजाबमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आपच्या जर्नेल सिंग यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती.