आंदोलक पैलवानांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल, काय होऊ शकते शिक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 01:53 PM2023-05-29T13:53:40+5:302023-05-29T13:54:57+5:30

नवनिर्वाचित संसद भवनासमोर 'महिला महापंचायत' करण्याता इरादा असलेल्या पैलवांनाना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.

Delhi Wrestlers of agitation booked under many sections, what can be the punishment? for sakshi malik and bajrang punia | आंदोलक पैलवानांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल, काय होऊ शकते शिक्षा?

आंदोलक पैलवानांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल, काय होऊ शकते शिक्षा?

googlenewsNext

नवी दिल्ली - सेंट्रल व्हिस्टा या संसदेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडला. मात्र, याच दिवशी दुसरीकडे जंतर-मंतरवर आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंनापोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून ते आंदोलक खासदार बृजभूषणसिंह यांच्या अटकेसाठी आंदोलन करत आहेत. आता, त्यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचीही नावं आहेत.

नवनिर्वाचित संसद भवनासमोर 'महिला महापंचायत' करण्याता इरादा असलेल्या पैलवांनाना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त असताना देखील आंदोलकांनी बॅरिकेट्स काढून संसद भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, आंदोलनस्थळी एकच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या कारवाईदरम्यानचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि इतर कुस्तीपटूंची पोलीस धरपकड करत असल्याचे दिसून आले.

 ... तर ५ वर्षांचा तुरुंगवास आणि दंड

या घटनेनंतर आता पोलिसांनी महिला कुस्तीपटूंना सोडून दिले असले तरी साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कलम, १८८, १८६, १४७, १४९, ३३२, ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पैलवान आणि आंदोलकांवर प्रिवेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी अॅक्टच्या कलम ३ अन्वये म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्यासंदर्भातील गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी दोषी आढळल्यास ५ वर्षे तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते.

पोलिसांच्या कारवाईवर देशभरातून संताप

दरम्यान, राजधानी दिल्लीतील या घटनेवरुन अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. देशासाठी मेडल जिंकणाऱ्या या कुस्तीपटूंचं कधीकाळी सर्वांनीच कौतुक केलं होतं, त्यांचा अभिमान बाळगला होता. आता, या कुस्तीपटूंचा हा अवमान आणि त्यांच्यावर होत असलेली ही कारवाई अवमानजनक असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. काँग्रेस, राष्ट्रवादीसह सेलिब्रिटींनीही यावर मत व्यक्त केलंय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केलाय. तर, स्वरा भास्कराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय.
 

Web Title: Delhi Wrestlers of agitation booked under many sections, what can be the punishment? for sakshi malik and bajrang punia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.