दिल्लीत आप इफेक्ट, पोलीस शिपायाला मागावी लागली ज्यूस विक्रेत्याची माफी

By Admin | Published: February 18, 2015 06:14 PM2015-02-18T18:14:10+5:302015-02-18T18:14:10+5:30

एका पोलीस शिपायाला ज्यूस विक्रेत्याची माफी मागावी लागली. हा शिपाई ज्यूस विक्रेत्याला धमकावत पैसे मागत असल्याचे आप कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

In Delhi, you apologized to the police officer, sorry for the seller | दिल्लीत आप इफेक्ट, पोलीस शिपायाला मागावी लागली ज्यूस विक्रेत्याची माफी

दिल्लीत आप इफेक्ट, पोलीस शिपायाला मागावी लागली ज्यूस विक्रेत्याची माफी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ -  एका पोलीस शिपायाला ज्यूस विक्रेत्याची माफी मागावी लागली. हा शिपाई ज्यूस विक्रेत्याला धमकावत पैसे मागत असल्याचे आप कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
मियांवली नगर येथील एका पार्कजवळ नारळ पाणी व ज्यूस विकणा-या व्यक्तीकडे एका पोलीस शिपायाने पैसे मागितले, विक्रेत्याने पैसे देण्यास नकारले असता पोलीस शिपाई त्याला धमकावत होता. ज्यूस विक्रेत्याने धमकीला नजुमानत या विभागातील आमदार रघुवेंद्र सिंह शौकीन यांच्या निवासस्थानी दुरध्वनीवरून संपर्क साधला. सुदैवाने रघुवेंद्र सिंह यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांनी नेमकी परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी घटनास्थळी आपच्या कार्यकर्त्यांना पाठवले. आपचे कार्यकर्ते तेथे गेले असता त्यांना पोलीस शिपाई ज्यूस विक्रेत्याला धमकावत असल्याचे दिसले. पोलिसाने मध्यस्थी करण्यास आलेल्या कार्यकर्त्यांशी हुज्जत घातली असता त्यांनी आम्ही  आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते असून आमदार शौकीन यांच्या सागंण्यावरून आल्याचे शिपायाला सांगितले. या घटनेदरम्यान सभोवताली अनेक लोक जमले असता शिपायाने ज्यूस विक्रेत्याची माफी मागून प्रकरण मिटवल्याचे आप कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. 
 

Web Title: In Delhi, you apologized to the police officer, sorry for the seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.