VIDEO : Hydrogen गॅस असलेल्या फुग्यांना बांधून डॉगीला उडवलं, यू-ट्यूबर Gaurav John ला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 02:30 PM2021-05-27T14:30:16+5:302021-05-27T14:34:28+5:30

माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, याप्रकरणी गौरव जोहन नावाच्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तो आपला पाळीव कुत्रा ‘डॉलर’चा व्हिडिओ तायर करत होता. हा व्हिडिओ त्याने यूट्यूबवरही टाकला होता. 

Delhi youtuber gaurav john arrested for dog with air balloon | VIDEO : Hydrogen गॅस असलेल्या फुग्यांना बांधून डॉगीला उडवलं, यू-ट्यूबर Gaurav John ला अटक

VIDEO : Hydrogen गॅस असलेल्या फुग्यांना बांधून डॉगीला उडवलं, यू-ट्यूबर Gaurav John ला अटक

Next

नवी दिल्ली - सध्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात एक युवक आल्या पाळीव कुत्र्याला हायड्रोजन (Hydrogen) असलेल्या फुग्यांना बांधून हवेत उडवतांना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच प्रकरण बिघडले आणि पोलिसांनी या युवकाला अटक केली. गौरव जोहन, असे या युवकाचे नाव होते. (Delhi youtuber gaurav john arrested for dog with air balloon)

यूट्यूबसाठी तयार केला होता व्हिडिओ -
माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, याप्रकरणी गौरव जोहन नावाच्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तो आपला पाळीव कुत्रा ‘डॉलर’चा व्हिडिओ तायर करत होता. हा व्हिडिओ त्याने यूट्यूबवरही टाकला होता. 

काय आहे व्हिडिओत?
या व्हिडिओत गौरवने कुत्र्याला हायड्रोडन गॅस असलेल्या फुग्यांना बांधले आहे आणि तो त्याला उडवताना दिसत आहे. कुत्रा धावू लागला, की थोडा-थोडा हवेत उडतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच, PFA संस्थेने आरोपी गौरवविरोधात पशू क्रूरता (Animal Cruelty) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी आरोपी गौरव आणि त्याच्या आईवर आयपीसीचे कलम 188, 269, 34 आणि पशू क्रूरता अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर मालवीय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गौरवला अटक करण्यात आली. 

हा व्हिडिओ गौरवने यूट्यूबवरून हटवला असला, तरी या व्हिडिओच्या क्लिप ट्विटरवर व्हायरल होत आहेत. ही घटना अमानवीय असल्याच्या प्रतिक्रिया लोक देत आहे.

Web Title: Delhi youtuber gaurav john arrested for dog with air balloon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.