राजधानी दिल्लीत डेंग्यू रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ, आकडा पोहोचला 5 हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 04:04 PM2021-11-15T16:04:22+5:302021-11-15T16:04:27+5:30
मागच्याच आठवड्यात 2569 डेंग्यू रुग्णांची वाढ झाली आहे.
नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये घट झालेली पाहायला मिळत असली तरी, डेंग्यूच्या(Dengue) रुग्णांमध्ये चांगलीच वाढ झालेली दिसत आहे. राजधानी दिल्लीत(Delhi ) डेंग्यूच्या रुग्णांनी 5 वर्षांचा विक्रम मोडला आहे. दिल्लीत यंदा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 5 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 5 वर्षांतील डेंग्यूचे हे सर्वाधिक रुग्ण आहेत. सध्या दिल्लीत 5277 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, डेंग्यूमुळे आतापर्यंत 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यंदा डेंग्यूमुळे नऊ जणांचा मृत्यू
देशाच्या राजधानीत डेंग्यूमुळे आतापर्यंत 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. 2017 नंतर दिल्लीत डेंग्यूमुळे झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. त्या वर्षी अधिकृतपणे 10 डेंग्यू रुग्णांचा मृत्यू झाला होता. सोमवारी महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवडाभरात 1170 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.
यंदा डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ
या वर्षी डेंग्यूच्या 2700 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, त्यापैकी 1171 या महिन्याच्या 6 तारखेपर्यंतचे आहेत. ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे 1196 रुग्ण आढळले. या वर्षी 30 ऑक्टोबरपर्यंत डेंग्यूचे एकूण 1537 रुग्ण होते आणि अधिकृत मृत्यूची संख्या सहा होती. अहवालानुसार, 9 नोव्हेंबरपर्यंत डेंग्यूमुळे नऊ जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 5277 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. 2018 नंतर याच कालावधीतील डेंग्यूचा हा सर्वाधिक आकडा आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये 217 रुग्णांची नोंद झाली, जी गेल्या तीन वर्षांतील त्या महिन्यातील डेंग्यूची सर्वाधिक संख्या होती.