इंटरनेट वापरात दिल्लीकर आघाडीवर

By admin | Published: April 20, 2017 05:28 PM2017-04-20T17:28:04+5:302017-04-20T17:28:04+5:30

सध्या भारतात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात नेटिझन्सकडून होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये दिल्लीकरांचा मोठा वाटा आहे.

Delhier leads the internet | इंटरनेट वापरात दिल्लीकर आघाडीवर

इंटरनेट वापरात दिल्लीकर आघाडीवर

Next
>ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. 20 - सध्या भारतात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात नेटिझन्सकडून होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये दिल्लीकरांचा मोठा वाटा आहे.
एका अहवालानुसार, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत दिल्लीतील नागरिक इंटरनेटचा वापर सर्वाधिक जास्त करत असून त्याखालोखाल कर्नाटक आणि महाराष्ट्रातील नागरिक करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
ई-इन्फ्रास्ट्रक्चर, ई-पार्टिसिपेशन, आयटी- इनवार्यमेंट, गव्हर्नमेंट ई- सर्व्हिस अशा चार टप्पात हा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये ईशान्येकडील राज्यांमध्ये नागालॅन्ड सोडून इतर राज्य इंटरनेटच्या वापरापासून लांब आहेत. तर, ई-इन्फ्रास्ट्रक्चर आणि ई-पार्टिसिपेशनमध्ये पंजाब पहिल्या स्थानावर आहे. दुस-या स्थानावर केरळ आहे. 
सध्या जगाच्या तुलनेत भारत इंटरनेट वापरात 155 व्या नंबरवर आहे. मात्र, येत्या 5-6 वर्षात पाचव्या स्थानकावर असेल. तसेच, देशातील ईशान्येकडील राज्यांसह देशातील इतर राज्यांमध्ये इंटरनेटचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून यासाठी नवनवीन योजना आखल्या जाणार असल्याची माहिती,  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिव अरुणा सुंदराजन यांनी दिली. 
 

Web Title: Delhier leads the internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.