दिल्लीतील पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय भवनाला भीषण आग, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 11:36 AM2019-03-06T11:36:38+5:302019-03-06T12:11:40+5:30
दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्समधील पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय भवन इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्समधील पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय भवन इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (6 मार्च) इमारतीच्या 5 व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीत एका सीआयएसएफ निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे(सीआयएसएफ) निरीक्षकांचा मृत्यू झाला आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
#UPDATE on Delhi's CGO Complex fire: According to the fire department, CISF Inspector who got unconscious in the fire incident today has passed away
— ANI (@ANI) March 6, 2019
याआधी दिल्लीतील नारायणा इंडस्ट्रीयलमधील पेपर कार्ड फॅक्टरीला गुरुवारी (14 फेब्रुवारी) भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. तसेच करोल बाग येथील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये मंगळवारी (12 फेब्रुवारी) भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. मृतांमध्ये सात पुरुष, एक लहान मुलगा आणि एका महिलेचा समावेश होता. तर भाजलेल्या व्यक्तींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच काही दिवसांपूर्वी दिल्लीतील किर्ती नगर परिसरात असलेल्या फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात फर्निचर आणि सामान जळून खाक झाले होते.
Delhi: Fire broke out at the office of Ministry of Social Justice and Empowerment in Pandit Deendayal Antyodaya Bhawan, at CGO Complex, today; 24 fire tenders present at the spot. #Delhipic.twitter.com/epcfEpr7eN
— ANI (@ANI) March 6, 2019
#Visuals: Fire breaks out on the 5th floor of Pandit Deendayal Antyodaya Bhawan at CGO Complex; 24 fire tenders present at the spot. #Delhipic.twitter.com/5csHdEfMiU
— ANI (@ANI) March 6, 2019
Delhi: 24 fire tenders present at Pandit Deendayal Antyodaya Bhawan, CGO Complex https://t.co/ol9rQJo8JH
— ANI (@ANI) March 6, 2019