दिल्लीतील अधिकारी म्हणजे भाजपाचीच 'बी टीम' - केजरीवाल

By admin | Published: December 31, 2015 05:00 PM2015-12-31T17:00:33+5:302015-12-31T17:00:53+5:30

दिल्लीतील आयएएस व डीएएनआयसीएस नागरी सेवेतील अधिकारी म्हणजे भाजपाचीच बी-टीम आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला

Delhi's official is BJP's 'B team' - Kejriwal | दिल्लीतील अधिकारी म्हणजे भाजपाचीच 'बी टीम' - केजरीवाल

दिल्लीतील अधिकारी म्हणजे भाजपाचीच 'बी टीम' - केजरीवाल

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३१ - दिल्ली सरकार व केंद्र सरकार यांच्यादरम्यानचा लढा आता आणखीनच तीव्र होताना दिसत असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा भाजपा व पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. 'दिल्लीतील आयएएस व डीएएनआयसीएस (दिल्ली, अंदमान अॅंड निकोबार आयलंड) नागरी सेवेतील अधिकारी म्हणजे भाजपाचीच बी-टीम आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. तसेच दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग हे पंतप्रधान कार्यालयातील नृपेंद्र मिश्रा यांच्या संपर्कात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 
मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेल्या फाईल्सवर स्वाक्षरी करायला नकार दिला म्हणून दिल्ली सरकारने डीएएनआयसीएस केडरचे यशपाल गर्ग आणि सुभाष चंद्रा या दोन अधिका-यांना बुधवारी निलंबित केले. या निलंबनाच्या कारवाई विरोधात आणि राज्य व केंद्र सरकारमधील संघर्षामध्ये अधिकारी भरडले असल्याचे सांगचत गुरुवारी दिल्लीतील २०० अधिकारी एकदिवसाच्या सामूहिक रजेवर गेले. 
मात्र केंद्र सरकारने गुरुवारी सकाळी दिल्ली सरकारने या अधिका-यांचे केलेले निलंबन रद्द केले. दिल्ली सरकारचा हा निर्णय बेकायदा ठरवत केंद्रीय गृहमंत्रालयाने  ही निलंबनाची कारवाई रद्द केली. केवळ दिल्लीचे नायब राज्यपाल केंद्र सरकारच्या परवानगीने दिल्ली, अंदमान अॅंड निकोबार आयलंड नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना निलंबित करू शकतात, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

Web Title: Delhi's official is BJP's 'B team' - Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.