Fuel Price: दिलासादायक...पेट्रोल-डिझेल 2.5 रुपयांनी स्वस्त करणार; जेटलींची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 03:26 PM2018-10-04T15:26:33+5:302018-10-04T15:32:42+5:30
देशातील जनता वाढत्या इंधन दरांमुळे महागाईच्या झळा सोसत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल 91.34 रुपये तर डिझेल 80.10 रुपयांना विकले जात आहे.
नवी दिल्ली : देशातील जनता वाढत्या इंधन दरांमुळे महागाईच्या झळा सोसत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल 91.34 रुपये तर डिझेल 80.10 रुपयांना विकले जात आहे. या पार्श्वभुमीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर 2.5 रुपयांनी कमी करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.
जेटली यांनी काल तेल उत्पादन कंपन्यांसोबत बैठक घेतली. यावेळी आढावा घेण्यात आला. जेटली यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्याने त्याची झळ देशाला बसली. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशातील इंधनाचे दर वाढले. कंपन्यांसोबत चर्चा करताना अबकारी कर खात्यासह इतर सर्व खात्यांशी चर्चा केली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतही चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रस्तावावर संमती दिली आहे.
We are writing to the state govts that as the central govt is cutting Rs 2.50 on both petrol & diesel, they do the same: FM Arun Jaitley pic.twitter.com/7QQ6TFrsnJ
— ANI (@ANI) October 4, 2018
केंद्र सरकार अबकारी करात 1.5 रुपये कपात करणार असून पेट्रोल उत्पादन कंपन्या 1 रुपया असे मिळून 2.5 रुपये पेट्रोल डिझेलची किंमत कमी करण्यात येत आहे, असे सांगत त्यांनी राज्य सरकारांच्या कोर्टात चेंडू टोलवला आहे. राज्य सरकारांकडे व्हॅटमुळे उत्पन्न वाढ होत आहे. तेलाची किंमत वाढली की व्हॅटनुसार त्यांचे उत्पन्नही वाढते. यामुळे राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा करणार असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून 5 रुपयांनी कपात करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
Excise duty to be reduced by Rs.1.50 & OMCs will absorb 1 rupee. So, a total of Rs.2.50 will be reduced on both diesel and petrol: Finance Minister Arun Jaitley pic.twitter.com/sV4eZwmKEw
— ANI (@ANI) October 4, 2018
काही राज्यांमध्ये तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका आणि काही महिन्यांवर असलेल्या लोकसभा निवडणुकीला महागाईची झळ बसणार आहे. यामुळे केंद्रातील भाजप सरकार निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांना आयतेच कोलीत मिळू नये म्हणून इंधनाचे दर कमी करण्याच्या तयारीत आहे.