लसीच्या दोन डोसमधील कमी अंतर कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटविरोधात अधिक प्रभावी : लॅन्सेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 11:52 PM2021-06-04T23:52:52+5:302021-06-04T23:55:08+5:30
Coronavirus Vaccine : डेल्टा व्हेरिअंट मानला जातो अधिक धोकादायक. देशात सध्या सुरू आहे लसीकरण मोहीम.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा पर्याय असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. दरम्यान, फायझर कंपनीचं लस (Pfizer Covid-19 Vaccine) ही कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिअंटविरोधात (Delta Varient) कमी प्रभावी असल्याचं 'द लॅन्सेट जर्नल'नं एका अहवालातून म्हटलं आहे. कोरोना विषाणूचं हे व्हेरिअंट अधिक धोकादायक असल्याचं म्हटलं जातं. जर कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी असेल तर लस डेल्टा व्हेरिअंटवरही अधिक प्रभावी ठरेल असं या अहवालात नमूग करण्यात आलं आहे. ज्या लोकांना लसीचा एकच डोस देण्यात आला आहे त्यांच्यात अँटीबॉडीजची प्रक्रिया कमी आहे. तसंच दोन डोसमध्ये अधिक अंतर ठेवल्यास डेल्टा व्हेरिअंटविरोधात अँटीबॉडी खुप कमी होऊ शकतात, असंही त्यात सांगण्यात आलं आहे.
या अहवालात ब्रिटनमध्ये लसींच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यासाठी वर्तमान योजनांचं समर्थन करण्यात आलं आहे. फायझर लसीच्या एका डोसनंतर लोकांमध्ये B.1.617.2 व्हेरिअंटविरोधआत अँटीबॉडीचा स्तर विकसित होण्याची शक्यता तितकीच कमी आहे, जितकी पहिले प्रभावी B.1.1.7 (अल्फा) व्हेरिअंटविरोधात दिसून आली होती असंही लॅन्सेटच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. "आमचे निकाल असं सांगतात की याचा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे लवकरात लवकर लसीचा दुसरा डोस देण्यात यावा आणि ज्यांची इम्युनिटी या नव्या व्हेरिअंटच्या तुलनेत अधिक असू शकत नाही त्यांना लवकर बूस्टर डोस देणं," असं लसीच्या दोन डोसमधील कमी अंतराबाबत बोलताना UCLH इन्फेक्शिअस डिजिज कन्सल्टेन्ट आणि सीनिअर क्लिनिकल रिसर्च फेलो एमा वॉल यांनी सांगितलं.
"केवळ शरीरातील अँटीबॉडीजचे स्तर लसीच्या प्रबावशीलतेबद्दल सांगत नाही. किती प्रमाणात त्या तयार होतात याचा अभ्यासही करणं आवश्यक आहे. कमी निष्क्रिय अँटीबॉडीचा स्तर अताही कोरोनापासून सुरक्षेशी जोडलेला असू शकतो," असं ब्रिटनमधील फ्रान्सिक क्रिक इन्स्टिट्यूटच्या संशोधकांच्या नेतृत्वाखालील टीमनं म्हटलं.