गिरणा काठच्या १५ गावांची धडक जिल्हाधिकार्‍यांना निवेदन : बहुळातून पाणी सोडण्याची मागणी

By admin | Published: January 19, 2016 11:04 PM2016-01-19T23:04:43+5:302016-01-19T23:04:43+5:30

जळगाव : गिरणा नदीकाठावरील डोकलखेडा, दहिगांव (संत), वरसाडे, माहिजी, कुरंगी, नांद्रा, लाजगाव, सामनेर, हनुमंतखेडा, ताडे, ब्राšाणे, भातखेडासह १५ गावातील नागरिकांनी बहुळा प्रकल्पातून दहिगांव (संत) बंधार्‍यात पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Demand for the 15 District Collectorate of Girna Katha | गिरणा काठच्या १५ गावांची धडक जिल्हाधिकार्‍यांना निवेदन : बहुळातून पाणी सोडण्याची मागणी

गिरणा काठच्या १५ गावांची धडक जिल्हाधिकार्‍यांना निवेदन : बहुळातून पाणी सोडण्याची मागणी

Next
गाव : गिरणा नदीकाठावरील डोकलखेडा, दहिगांव (संत), वरसाडे, माहिजी, कुरंगी, नांद्रा, लाजगाव, सामनेर, हनुमंतखेडा, ताडे, ब्राšाणे, भातखेडासह १५ गावातील नागरिकांनी बहुळा प्रकल्पातून दहिगांव (संत) बंधार्‍यात पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या गावांमधील सरपंच व उपसरपंच जिल्हाधिकारी कार्यालयात आले. सध्या दहिगाव बंधार्‍यात पाणी नसल्यामुळे विहिरींना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे व गुराढोरांचे प्रचंड हाल होत आहेत. बहुळा प्रकल्पात समाधानकारक व अतिरिक्त पाणीसाठा आहे. या धरणातून दहिगाव बंधार्‍यात एक आवर्तन दिल्यास १५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे निवेदनकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. जिल्हाधिकारी यांनी १५ दिवसात याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी सचिन पाटील, सुनील जावळे, महेंद्र पाटील, गिरीश पाटील, नवलसिंग पाटील, बापू सूर्यवंशी, साहेबराव साबळे, रविकांत पाटील, शत्रुघ्न साळवे, अनिल सोनवणे, गजानन पवार, गुलाब पाटील, डी.के.पाटील, मनोज पाटील, प्रवीण पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रशासनाने न सोडविल्यास नांद्रा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांतर्फे देण्यात आला.

Web Title: Demand for the 15 District Collectorate of Girna Katha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.