कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या निवेदन : छावा मराठा युवा संघटनेची मागणी

By admin | Published: July 18, 2016 06:25 PM2016-07-18T18:25:50+5:302016-07-18T18:25:50+5:30

जळगाव : अहमदनगर जिल्‘ातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार करून तिचा क्रूर व अमानुषपद्धतीने खून केल्याप्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी या आशयाच्या मागणीचे निवेदन छावा मराठा युवा संघटनेतर्फे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना देण्यात आले.

Demand of the accused in the Kopardi torture case: Demand for the Chhava Maratha youth organization | कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या निवेदन : छावा मराठा युवा संघटनेची मागणी

कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या निवेदन : छावा मराठा युवा संघटनेची मागणी

Next
गाव : अहमदनगर जिल्‘ातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार करून तिचा क्रूर व अमानुषपद्धतीने खून केल्याप्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी या आशयाच्या मागणीचे निवेदन छावा मराठा युवा संघटनेतर्फे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना देण्यात आले.
कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्यानंतरही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर विविध संघटनांनी रास्तारोको व बंद पुकारून घटनेचा निषेध केला आहे. अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी अ.भा.मराठा युवा संघटन व छावा संघटनेतर्फे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, महिला जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, महिला महानगराध्यक्षा वंदना पाटील, रावेर जिल्हाध्यक्ष राजु कुमावत, संपर्क प्रमुख ईश्वर पवार, राजू पाटील, छोटू पाटील, विनोद चौधरी, सुनील महाजन, अनिल पाटील, राजू पाटील, शैलेश पाटील, पंकज पाटील, सुनील भदाणे, राजू महाजन, गौरव सपकाळे उपस्थित होते.

आंबेडकर भवन पाडणार्‍या रत्नाकर गायकवाड यांना अटक करा
जळगाव : मुंबई येथील दादर भागातील गोकुळदास रोड जवळील इप्रुव्हमेंट ट्रस्टचे सल्लागार रत्नाकर गायकवाड व त्यांच्या सहकार्‍यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन उद्ध्वस्त केले. तसेच बुद्ध भूषण प्रेसची नासधूस केली. याप्रकरणी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड व त्यांच्या सहकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संबंधितांना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. या घटनेचा भारत मुक्ती मोर्चातर्फे निषेध करण्यात आला. तसेच संशयित आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुकुंद सपकाळे, मुकुंद नन्नवरे, संजय सपकाळे, सतीश गायकवाड, किरण वाघ, आनंदा तायडे, अनुप पानपाटील, फहिम पटेल, साबीर खान, सुरेश पाटील, मिलिंद तायडे, सतीश गायकवाड, भारत सोनवणे, प्रफुल्ल पाटील, गणेश बिर्‍हाडे, मनोज पवार, विजय करंदीकर, राजेंद्र पाटील, खुशाल चव्हाण, दिलीप सपकाळे, संजय सपकाळे, संतोष ढिवरे, रवींद्र सोनवणे, अशफाक पिंजारी, समाधान लोखंडे, टी.एच.भालेराव, रामन जाधव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Demand of the accused in the Kopardi torture case: Demand for the Chhava Maratha youth organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.