आदित्यनाथ यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी
By admin | Published: September 4, 2014 01:25 AM2014-09-04T01:25:10+5:302014-09-04T01:25:10+5:30
भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ प्रक्षोभक वक्तव्य करून देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याविरुद्ध करण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम बुद्धिजीवींच्या संघटनेने केली.
Next
अलीगड : भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ प्रक्षोभक वक्तव्य करून देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याविरुद्ध करण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम बुद्धिजीवींच्या संघटनेने केली.
मिल्लत बेदारी मुहिम कमिटीने (एमबीएमसी) मंगळवारी एक ठराव संमत केला. सांप्रदायिक दंगली केवळ हिंदू किंवा मुस्लिम यांच्यामुळे झालेल्या नाहीत तर ज्यांचे अस्तित्व सांप्रदायिकतेच्या आधारे समाजाचे ध्रुवीकरणावर अवलंबून आहे त्या सांप्रदायिक पक्षांच्या आणि संघटनांमुळे दंगली घडल्या आहेत, असे या ठरावात म्हटले आहे.
बाबरी मशीद वादानंतर मुंबई दंगलीची चौकशी करणा:या श्रीकृष्ण आयोगासह विविध आयोगांनी अशा पक्षांची ओळख पटवली आहे, असे एमबीएमसीचे मोहम्मद म्हणाले.
यूपीतील गोरखपूरचे भाजपा खासदार आदित्यनाथ यांनी अलीकडे वादग्रस्त वक्तव्य केले होते. जिथे कुठे अल्पसंख्यक 1क् टक्क्यांहून अधिक असतात तिथे दंगली घडतात. दुसरीकडे जिथे अल्पसंख्यकांची संख्या 35 टक्क्क्यांहून अधिक आहे तिथे बिगर मुस्लिम लोकांना स्थान नाही, असे आदित्यनाथ म्हणाले होते. ठरावावर एएमयू कार्यकारी परिषदेचे नियुक्त सदस्य मोहम्मद शाहीद, एमएमयूटीएचे माजी अध्यक्ष प्रोफेसर रजाउल्ला खान आणि एएमयूचे विज्ञान शाखेच्या माजी अधिष्ठाता यांची स्वाक्षरी आहे. (वृत्तसंस्था)
(वृत्तसंस्था)