डी रूपा यांच्या बदलीच्या निषेधार्थ कर्नाटकातील भाजप नेत्यांची निदर्शनं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 10:38 AM2017-07-18T10:38:46+5:302017-07-18T10:38:46+5:30

डी रूपा यांच्या बदलीच्या निषेधार्थ कर्नाटकातील भाजप नेत्यांनी निदर्शनं सुरू केली आहेत.

Demand of BJP leaders in Karnataka, protesting against replacing D Rupa | डी रूपा यांच्या बदलीच्या निषेधार्थ कर्नाटकातील भाजप नेत्यांची निदर्शनं

डी रूपा यांच्या बदलीच्या निषेधार्थ कर्नाटकातील भाजप नेत्यांची निदर्शनं

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 18-   बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना कारागृहात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचं उघड करणा-या महिला पोलीस अधिका-याची बदली करण्यात आली होती. या बदलीच्या निषेधार्थ कर्नाटकातील भाजपाच्या नेत्यांनी निदर्शन सुरू केली आहेत. दिल्लीत संसदेच्या बाहेर भाजपचे नेते हातात निषेधाची फलकं घेऊन निदर्शनं करत आहेत. डी रूपा या प्रामाणिक आयपीएस अधिकारी आहेत. प्रामाणिकपणाने त्यांनी काम करून त्यांनी भ्रष्टाचार उघड केला होता. पण त्यांच्या प्रामाणिकपणाची ही शिक्षा मिळते आहे. असं मत निदर्शन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलं आहे. काम करताना आपली जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचं रक्षण सरकारने करायला हवं, असंही मत भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलं आहे. "प्रोटेक्ट होनेस्ट ऑफिसर इन कर्नाटक" अशा आशयाचे फलक निदर्शनकर्त्या नेत्यांच्या हातात आहेत.
आणखी वाचा
 

रशियाला भूकंपाचा झटका, त्सुनामीची भीती

भारत-चीन युद्धाची खोटी बातमी प्रसारित करतंय पाकिस्तानी चॅनेल

लष्कर-ए-तैयबाच्या सलीम खानला मुंबई विमानतळावर अटक

बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना कारागृहात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचं आपीएस अधिकारी डी रूपा यांनी उघड केलं होता.  इतका मोठा भ्रष्टाचार उघड केला असताना पाठीवर कौतुकाची थाप देण्याऐवजी हाती बदलीचं पत्र देण्यात आलं. डी रुपा यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आली. डी रुपा यांच्यावर अधिका-यांना कोणतीही माहिती किंवा पुर्वकल्पना न देता प्रसारमध्यांमध्ये माहिती लीक केल्याचा आरोप करण्यात करण्यात आला होता.

कारागृहाच्या उपमहानिरीक्षक डी रुपा यांनी अधिकारी कारागृहात बेकायदेशीर गोष्टी करण्यास परवानगी देत असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. शशिकला यांना स्वयंपाकासाठी स्वतंत्र रुम देण्यात आली आहे. तसंच स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी यालादेखील विशेष सुविधा मिळत असल्याचा असा खुलासा डी रुपा यांनी केला होता. त्यांनी यासंबंधी पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक आर के दत्ता तसंच कारागृह पोलीस महासंचालक सत्यनारायण राव यांना पत्र लिहिलं होतं. कर्नाटक सरकारलाही यासंबंधी अहवाल पाठवण्यात आला होता.
मात्र अधिका-याने पाठवलेला अहवाल लीक झाला आणि मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत केली होती. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी डी रुपा प्रसारमाध्यमांकडे गेल्याने त्यांच्याविरोधातही कारवाईचा आदेश दिला होता. नियमाप्रमाणे अधिकारी अशाप्रकारे प्रसारमाध्यमांशी बोलू शकत नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.
 यावर स्पष्टीकरणे देताना डी रुपा यांनी सांगितलं होतं की, "मी कोणताही अहवाल लीक केलेला नाही किंवा कोणतीही गुप्त माहिती उघड केलेली नाही. मी माही तर माझे बॉस कारागृह पोलीस महासंचालक सत्यनारायण राव यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांसोबत शेअर केली. मग नियम सर्वांना सारखेच असले पाहिजेत". "प्रत्येकासाठी वेगळा नियम असू शकत नाही. जर माझी चौकशी झाली तर सगळ्यांचीच झाली पाहिजे", असंही डी रुपा यांनी सांगितलं होतं. सत्यनारायण राव यांनी मात्र डी रुपा यांचे दावे फेटाळून लावले होते. 
काय होतं पत्रात - 
"कारागृहात नियमांचं होणारं उल्लंघन तुमच्या निदर्शनास आणून देत आहे. इतकंच नाही या सर्वांसाठी दोन कोटींचा लाच दिल्याचंही बोललं जात आहे. कृपया तुम्ही तात्काळ कारवाई करत, नियम मोडणा-यांना शिक्षा करावी", अशी विनंती रुपा यांनी पत्रातून केली होती.  याशिवाय रुपा यांनी अन्य गंभीर आरोपही केले होते. 10 जुलै रोजी कारागृहातील 25 जणांची ड्रग टेस्ट करण्यात आली होती. यावेळी 18 जणांनी ड्रग्ज घेतल्याचं निष्पन्न झालं होतं. रुपा यांनी त्या सर्वांची यादीच पत्रात लिहिली होती. 

Web Title: Demand of BJP leaders in Karnataka, protesting against replacing D Rupa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.