पुलावरून येणार्यांचा विमा उतरवा आयुक्तांना निवेदन: अश्विनी देशमुख यांची मागणी
By admin | Published: August 10, 2016 10:03 PM2016-08-10T22:03:54+5:302016-08-10T22:03:54+5:30
जळगाव : शिवाजीनगर उड्डाण पुलावरून ये-जा करणारे पादचारी, वाहनधाकर तसेच पुलानजीक रहाणार्या कुटुंबांचा प्रत्येक २५ लाखांचा विमा महापालिकेने उतरवावा अशी मागणी करणारे निवेदन नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.
Next
ज गाव : शिवाजीनगर उड्डाण पुलावरून ये-जा करणारे पादचारी, वाहनधाकर तसेच पुलानजीक रहाणार्या कुटुंबांचा प्रत्येक २५ लाखांचा विमा महापालिकेने उतरवावा अशी मागणी करणारे निवेदन नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जीर्ण झालेल्या शिवाजीनगरकडे जाणारा रेल्वे उड्डाण पूल अतिशय जीर्ण झाला आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाने मनपास वेळोवेळी पत्रही दिले आहे. या पुलाच्या खालून अनेक मालवाहू गाड्या तसेच प्रवासी वाहतूक करणार्या एक्सप्रेस गाड्या ये-जा करत असतात. शिवाजी नगर व परिसरातील अनेक कॉलन्यांमध्ये शेकडो लोक रहात असतात. येणार्या जाणार्यांमध्ये हजारो शालेय विद्यार्थीही आहेत. पुलाची अवस्था पाहून नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला आहे मात्र पर्याय नसल्याने त्याचा वापर केला जात आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पूल वापरास बंद करावा व नागरिकांना पर्यायी व्यवस्था करून द्यावी, अन्यथा या पुलावरून ये-जा करणारे पादचारी व वाहनधारक तसेच पुलाच्या नजीक राहणारी रहिवासी यांचा प्रत्येकी २५ लाखांचा विमा महापालिकेने उतरवावा अशी मागणी अश्विीन देशमुख यांनी केली आहे.