मानवी अन्याय निवारणचे आंदोलन मागणी: पाच गावात निवडणुका घ्या
By admin | Published: January 26, 2017 02:09 AM2017-01-26T02:09:03+5:302017-01-26T02:09:03+5:30
जळगाव : जिल्हयातील कोळन्हावी, भालशिव, बोरावल, पिंप्री, शिरागड या गावांमध्ये गेल्या १७ वर्षात निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. मतदारांना त्यांच्या हक्काच्या मतदानापासून वंचित ठेवले जात असते. या मतदारांना न्याय मिळावा या मागणीसाठी मानवी अन्याय निवारण केंद्रातर्फे करण्यात आली असून या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
Next
ज गाव : जिल्हयातील कोळन्हावी, भालशिव, बोरावल, पिंप्री, शिरागड या गावांमध्ये गेल्या १७ वर्षात निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. मतदारांना त्यांच्या हक्काच्या मतदानापासून वंचित ठेवले जात असते. या मतदारांना न्याय मिळावा या मागणीसाठी मानवी अन्याय निवारण केंद्रातर्फे करण्यात आली असून या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. कोळन्हावी, भालशिव, बोरावल, पिंप्री, शिरागड या ग्रामपंचायतींची गेल्या १७ वर्षापासून निवडणूक होऊ शकलेली नाही. घटनेने दिलेल्या मुलभूत हक्कापासून या गावांमधील जनतेला वंचित ठेवले जात आहे. या मागणीसाठी गेल्या वर्षी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते मात्र तरीही नागरिकांना न्याय मिळू शकला नसल्याची खंत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमाकांत वाणी यांनी व्यक्त केली. या गावांमधील त्यांचा मतदानाचा हक्क मिळावा यासाठी प्रजासत्ताक दिनीदेखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या समवेत अरमान शाह, संगिता पाटील, मीना पाटील, पद्मश्री पाटील, सविता पाटील, मंगला शिरसाठ आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत.