पशुधनासाठी चारा-खुराक सुरक्षा कायद्याची मागणी
By Admin | Published: September 4, 2015 10:46 PM2015-09-04T22:46:36+5:302015-09-04T22:46:36+5:30
नांदेड : माणसांसाठी जसा अन्न सुरक्षा कायदा आणला, त्याच धर्तीवर पशुधनासाठी चारा व खुराक सुरक्षा कायदा करून महाराष्ट्र शासनाने देशात नव्हे जगात आपली वेगळी ओळख निर्माण करावी़ शिवाय केवळ छावण्या उभारून पशुधनाचा प्रश्न सुटणार नाही़ तर स्वस्त धान्य दुकानांप्रमाणेच जनावरांसाठीही स्वस्त पशुखाद्य दुकानांची सुरुवात करावी, असे मत पशुवैद्यक शास्त्रज्ञ डॉ़ गजानन ढगे यांनी येेथे व्यक्त केले़
न ंदेड : माणसांसाठी जसा अन्न सुरक्षा कायदा आणला, त्याच धर्तीवर पशुधनासाठी चारा व खुराक सुरक्षा कायदा करून महाराष्ट्र शासनाने देशात नव्हे जगात आपली वेगळी ओळख निर्माण करावी़ शिवाय केवळ छावण्या उभारून पशुधनाचा प्रश्न सुटणार नाही़ तर स्वस्त धान्य दुकानांप्रमाणेच जनावरांसाठीही स्वस्त पशुखाद्य दुकानांची सुरुवात करावी, असे मत पशुवैद्यक शास्त्रज्ञ डॉ़ गजानन ढगे यांनी येेथे व्यक्त केले़चारा प्रश्नावर एमजीएमच्या कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ़ढगे म्हणाले, शेतकर्यांना दिलासा द्यायचा असेल तर कालबद्ध कार्यक्रम आखावा लागेल़ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत, कमी पाण्यावर अधिक प्रमाणात लुसलुशीत चारा निर्माण करता येवू शकतो़ याउलट चारा छावण्यांमधून होणारे गैरव्यवहार, पाणी न मिळणे अशा तक्रारी यापूर्वी ऐकलेल्या आहेत़ शिवाय छावणीत एकाच ठिकाणी अनेक जनावरे आल्याने त्यातून संसर्ग व साथीचे आजार बळावण्याची शक्यता असते़ तरीही जिथे चारा छावणी उभारणे शक्य नाही, तिथे शेतकर्यांना चार्याचा कोटा ठरवून द्यावा़ दूधाळ व कामकरी जनावरांसाठी रक्कम निर्धारित करून शेतकर्यांच्या बँक खात्यावर चार्याची किंमत रोख स्वरुपात जमा करावी़ शेतकरी गट, समुहाने त्यांच्या आवडी व गरजेप्रमाणे चारा खरेदी करावा, हा पर्याय देता येईल़