दिंडीसाठी पोलीस बंदोबस्तासह गॅस, केरोसिनची मागणी
By admin | Published: May 22, 2016 07:39 PM2016-05-22T19:39:46+5:302016-05-22T23:57:59+5:30
नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यासाठी पोलीस बंदोबस्तासह भाविकांच्या भोजनव्यवस्थेसाठी गॅस सिलिंडर व केरोसिन पुरवण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेतर्फे करण्यात आली असून, संघटनेतर्फे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे.

आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेसाठी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची पायी दिंडी त्र्यंबकेश्वरहून नाशिक, अहमदनगर, करमाळा मार्गे मार्गक्रमण करीत असते. पालखी सोहळ्यात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, कल्याण, ठाणे, मुंबई आदि भागातून लाखो वारकरी सहभागी होतात. या दिंडी सोहळ्यासाठी नाशिक जिल्ाच्या हद्दीपासून वावी पोलीस स्टेशनपर्यंत पोलीस बंदोबस्त पुरवला जातो. पुढील दिंडीसोबत पोलीस बंदोबस्त नसल्याने वारक र्यांना वाहतुकीच्या वर्दळीमुळे विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालखीला पोलीस बंदोबस्त पुरवण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली असून, दिंडीतील भाविकांच्या भोजनाच्या सोयीसाठी गॅस सिलिंडर व केरोसिन पुरविण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेतर्फे करण्यात आली आहे.