सेमी इंग्रजीच्या वर्गांना त्वरित मान्यता देण्याची मागणी मुख्याध्यापक संघाचे शिक्षण उपसंचालकांना निवेदन
By admin | Published: November 3, 2016 10:49 PM2016-11-03T22:49:10+5:302016-11-03T23:58:23+5:30
नाशिक : गेल्या चार वर्षांपासून जिल्ातील सुमारे ४५0 शाळांच्या सेमी इंग्रजीच्या वर्गांना मान्य द्यावी, या मागणीचे प्रस्ताव प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्यांकडे प्रलंबित आहेत. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. यासंबंधी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
नाशिक : गेल्या चार वर्षांपासून जिल्ातील सुमारे ४५0 शाळांच्या सेमी इंग्रजीच्या वर्गांना मान्य द्यावी, या मागणीचे प्रस्ताव प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्यांकडे प्रलंबित आहेत. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. यासंबंधी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा मराठा हायस्कूल येथे पार पडली. गेल्या चार वर्षांपासून जिल्ातील ४00 ते ४५0 शाळांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. पाचवी ते आठवीच्या वर्गांचे प्रस्ताव प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे तर नववी, दहावीचे प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहेत. दहावी परीक्षा जाहीर झाली तरीही मान्यता मिळत नाही. यासाठी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपसंचालकांकडे तक्रार करूनही मार्ग निघत नसल्याचे दिसते, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची मेडिकल देयके, मुख्याध्यापकांच्या कायमस्वरूपी मान्यता रोस्टर तपासणी समायोजन आदि मागण्या प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे मंडळ मान्यता वर्धित करण्यासंदर्भात शाळांची वार्षिक तपासणी करणे, प्रमाणपत्र त्वरित व विनाअट देणे, संच मान्यतेत चुकांची दुरुस्ती करून देणे, विनाअनुदानित व मूल्यांकन झालेल्या शाळांना विनाअट २0 टक्के अनुदान देणे, जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करणे, आदि मागण्यांकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.
यावेळी तालुका मुख्याध्यापक संघाला व जिल्हा मुख्याध्यापक संघाला सहभागी करून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचणीच्या निकालासाठी कालावधी वाढवणे व अन्य मागण्या मुख्याध्यापक संघाच्या सहविचार सभेत करण्यात आल्या.
या सभेसाठी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. शिरसाठ कार्यवाह एस. बी. देशमुख, के. के. अहिरे, एस. डी. शेलार, एस. टी. पिंगळे, जया कासार, के. डी. देवढे, ए. टी. पवार, माणिक मढवई, एस. एम. बच्छाव, शरद गिते, एस. के. सावंत, आर. डी. निकम, राजेंद्र लोंढे, दीपक ाळीज, डी. एस. ठाकरे, राजेंद्र सावंत, पी. व्ही. डोखळे, बी. व्ही. पांडे, साहेबराव कुटे यांच्यासह नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व तालुका मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)