इगतपुरी तालुक्यातील विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी
By admin | Published: October 1, 2016 10:45 PM2016-10-01T22:45:14+5:302016-10-01T23:36:30+5:30
विविध विकासकामाच्या मागणीचे इगतपुरी पंचायत समिती पदाधिका-यांचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा याना निवेदन
विविध विकासकामाच्या मागणीचे इगतपुरी पंचायत समिती पदाधिका-यांचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा याना निवेदन
तालुक्यातील विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी
घोटी : इगतपुरी तालुक्याचा आदिवासी क्षेत्रात समावेश असून मोठ्या प्रमाणात आदिवासी विकास विभागामार्फत विविध विकासकामासाठी निधी उपलब्ध होतो.परंतु शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे आदिवासी बांधवाना विकासापासून वंचित राहावे लागते.इगतपुरी तालुक्यातील विविध विकासकामाच्या मागणी व निर्माण होणा-या अडचणी दूर कराव्यात याबाबतचे निवेदन इगतपुरी पंचायत समतिीचे सभापती गोपाळ लहांगे, उपसभापती पांडुरंग वारु ंगसे यांनी आदिवासी विकास मंत्री ना.विष्णू सावरा यांना दिले.
पंचायत समतिीच्या पदाधिकारी व शिष्टमंडळाने आदिवासी विकास मंत्री ना.विष्णू सावरा यांची भेट घेतली.व निवेदन दिले.या निवेदनात स्पष्ट करण्यात आले कि,तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी इमारती,व शाळा दुरु स्ती साठी निधी,संरक्षक भीती,अंगणवाडी इमारती साठी मंजुरी,तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्ती असूनही काही ग्रामपंचायतचा पेसा मध्ये समावेश नाही,त्यांचा पेसा मध्ये समावेश करून निधी मिळावा, ठक्कर बाप्पा योजनेचा ग्रामपंचायत निधीची मर्यादा वाढवून दयावी.२००६ ते २००७ च्या दारिद्रय रेषेच्या यादीतील वंचित नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, रस्ते दुरु स्ती व नूतनीकरण यासाठी निधी मिळावा, विविध भागातील रिक्त असलेले कर्मचारी भरणे व प्रतिनियुक्ती वर असलेले कर्मचारी मूळस्थानी कामावर पाठविण्यात यावेत , तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामपंचायतमध्ये झालेल्या घटनांची चौकशी न करता त्यांना पाठीशी घालणा-याची चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान यावेळी ना.सावरा यांनी सदर मागण्यांबाबत लवकरच कार्यवाही करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
या शिष्ट मंडळात पंचायत समतिीचे सभापती गोपाळ लहांगे, उपसभापती पांडुरंग वारु ंगसे यांच्यासह माजी आमदार शिवराम झोले,माजी सभापती निवृत्ती जाधव,लक्ष्मण (लकी)जाधव ,बाळू धांडे आदींचा समावेश होता.(वार्ताहर)