नशिराबादला शुद्ध पाण्यासाठी वणवण मिनरल वॉटर जारला वाढली मागणी
By admin | Published: April 24, 2016 12:39 AM2016-04-24T00:39:11+5:302016-04-24T00:39:11+5:30
नशिराबाद- कायमस्वरुपी शुद्ध पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसल्याने व पाणी टंचाईमुळे पर्यायाने एमआयडीसीचे पाणी उन्हाळ्यात घ्यावेच लागते. सध्या पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. मात्र एमआयडीसीचे पाणी पिवळसर, फेसयुक्त दूषित येत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. दरम्यान मिनरल वॉटर, जार यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
Next
न िराबाद- कायमस्वरुपी शुद्ध पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसल्याने व पाणी टंचाईमुळे पर्यायाने एमआयडीसीचे पाणी उन्हाळ्यात घ्यावेच लागते. सध्या पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. मात्र एमआयडीसीचे पाणी पिवळसर, फेसयुक्त दूषित येत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. दरम्यान मिनरल वॉटर, जार यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.वर्षानुर्षापासून ग्रामस्थांना पाणी टंचाईची झळ बसत आहे. यंदा डिसेंबर अखेरपासूनच पाणीपुरवठा करणार्या जलस्त्रोतांची पातळी खोलवर गेल्याने पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. त्यातच वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. मुर्दापूर, बेळी येथील पाणी पुरवठा गावास होत आहे. १० ते १२ दिवसाआड पाणी मिळत असल्याने टंचाई निवारणार्थ ग्रामपंचायतीने पर्यायाने एमआयडीसीचे पाणी मिळविण्यासाठी धाव घेतली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून एमआयडीसीचे पाणी ग्रामस्थांना मिळाले. वाघूर, मूर्दापूर, एमआयडीसी मिळून गावाला सध्या चौथ्या ते पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे. एमआयडीसीच्या पाण्याने टंचाईची तिव्रता कमी झाली असली तरी शुद्ध पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट होत आहे.फेसयुक्त, पिवळसर, दूषित पाण्याची ओरड नागरिकांमधून होत असली तरी टंचाईची तीव्रता कमी झाल्याबाबत दिलासा आहे. दूषित पाण्यामुळे तोंड येणे, पोटात बिघाड आदी समस्यांची ओरड होत आहे. एमआयडीसीचे पाणी जास्त दिवस साठवण केल्यास बारीक आळी पडताना दिसत आहे.दरम्यान, पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळविण्यासाठी नागरिक पायपीट करीत आहे. १० ते २५ रुपयांपर्यंत मिळणार्या मिनरल वॉटर,जार यांना मागणी वाढली आहे.चौकटएमआयडीसीचे पाणी दूषितएमआयडीसीचे पाणी पिवळसर व फेसयुक्त दूषित असल्याचा आरोप माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी स्मार्ट सिटीच्या बैठकीत केला होता. पाणीसाठा मुबलक आहे मात्र त्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण आतापासून ग्रामपंचायतीने करणे आवश्यक आहे. मूर्दापूर धरणाजवळील विहिरीचा व्यास व खोल करणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणीटंचाई निवारण होईल व पर्यायाने एमआयडीसीचे पाणी घ्यावे लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.