नवीन पोलसाठी निधीची मागणी
By admin | Published: January 23, 2017 08:13 PM2017-01-23T20:13:33+5:302017-01-23T20:13:33+5:30
जळगाव: गणेश कॉलनी चौक ते न्यायालयापर्यंतच्या रस्तावर नवीन पोल व वीजवाहिनी टाकण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून नाविन्य पूर्ण योजनेतून निधी मंजूर करण्याची मागणी भाजपाच्या नगरसेविका जयश्री नितीन पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. इच्छादेवी चौक ते डी-मार्ट पर्यंतच्या रस्त्यावर हेच काम जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आलेले असल्याने हे काम देखील मंजूर करण्याची मागणी केली आहे.
Next
ज गाव: गणेश कॉलनी चौक ते न्यायालयापर्यंतच्या रस्तावर नवीन पोल व वीजवाहिनी टाकण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून नाविन्य पूर्ण योजनेतून निधी मंजूर करण्याची मागणी भाजपाच्या नगरसेविका जयश्री नितीन पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. इच्छादेवी चौक ते डी-मार्ट पर्यंतच्या रस्त्यावर हेच काम जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आलेले असल्याने हे काम देखील मंजूर करण्याची मागणी केली आहे. बाजाराला लागली शिस्तजळगाव- मनपाने कासमवाडी येथील आठवडे बाजाराच्या जागेवर पे आखून दिल्याने शनिवारी या ठिकाणी बाजार शिस्तीत भरला. याआधी पे आखून दिलेले नसल्याने हॉकर्सकडून मनमानीपणे जागा अडविली जात होती. तसेच स्पर्धेमुळे जुन्या मेहरूण रस्त्यावरच गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळाही होत होता. माजी नगरसेविका आशा सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते शांताराम सूर्यवंशी यांनी याविषयी मनपाकडे पाठपुरावा केल्याने हे पे आखण्यात आले. वसुली न झाल्यास कारवाईजळगाव- मनपाच्या मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी चारही प्रभाग समिती कार्यालयांना पूर्ण क्षमतेने प्रयत्न करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. अन्यथा संबंधीत कर्मचारी व प्रभाग अधिकार्यांवरही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नोटबंदीमुळे जुन्या नोटा भरण्याची सवलत मिळाल्याने मोठ्याप्रमाणावर नागरिकांनी मनपाकडे कर भरणा केला. मात्र त्यात मागील थकबाकीची अपेक्षित वसुली झालेली नाही.