‘अधिनायक’ शब्द हटविण्याची मागणी
By admin | Published: July 7, 2015 11:19 PM2015-07-07T23:19:13+5:302015-07-07T23:19:13+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजी शासकांची प्रशंसा करणारा ‘अधिनायक’ हा शब्द हटविला जावा. त्याऐवजी ‘मंगल’ या शब्दाचा वापर करावा, अशी मागणी राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी केली आहे.
जयपूर : स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजी शासकांची प्रशंसा करणारा ‘अधिनायक’ हा शब्द हटविला जावा. त्याऐवजी ‘मंगल’ या शब्दाचा वापर करावा, अशी मागणी राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी केली आहे.
‘जन-गण-मन अधिनायक जय हे’ यातील अधिनायक हा शब्द ब्रिटिश काळात इंग्रजी शासकांची प्रशंसा करणारा होता. त्याऐवजी ‘जन- गण- मन- मंगल गाए’ असा शब्दप्रयोग केला जावा, असे ते राजस्थान विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात भाषण देताना म्हणाले. राष्ट्रगीत लिहिणारे कवी रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. मात्र, महामहीम किंवा एक्सलन्सी हा शब्दही वगळला जावा. राज्यपालांसाठी माननीय हा शब्द वापरावा कारण ब्रिटिश काळात संबोधले जात होते त्याप्रमाणे राज्यपाल ‘महान’ नाहीत, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)