धमकावणार्‍या वाळू व्यावसायिकांना एमपीडीए लावा प्रशासनाला निवेदन : आव्हाणे येथील ग्रामस्थांचे निवेदन

By admin | Published: November 5, 2016 12:14 AM2016-11-05T00:14:01+5:302016-11-05T00:14:01+5:30

जळगाव : आव्हाणे ता.जळगाव व आव्हाणी ता.धरणगाव येथील शेतकर्‍यांना गिरणा नदीतून येण्यासाठी वाळू व्यावसायिकांनी रस्ताच ठेवला नाही. वाळू रात्रंदिवस चोरून नदीत ५० फुटांचे खड्डे केले. चोरीला मज्जाव केला तर वाळू चोरटे धमकावतात. त्यांच्यावर एमपीडीए कायद्यानुसार ठोस कारवाई करावी, अशी मागणी आव्हाणे ता.जळगाव येथील ग्रामस्थ, शेतकरी यांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

Demand to sand commercial practitioners to get MPA, submit a request to the administration: | धमकावणार्‍या वाळू व्यावसायिकांना एमपीडीए लावा प्रशासनाला निवेदन : आव्हाणे येथील ग्रामस्थांचे निवेदन

धमकावणार्‍या वाळू व्यावसायिकांना एमपीडीए लावा प्रशासनाला निवेदन : आव्हाणे येथील ग्रामस्थांचे निवेदन

Next
गाव : आव्हाणे ता.जळगाव व आव्हाणी ता.धरणगाव येथील शेतकर्‍यांना गिरणा नदीतून येण्यासाठी वाळू व्यावसायिकांनी रस्ताच ठेवला नाही. वाळू रात्रंदिवस चोरून नदीत ५० फुटांचे खड्डे केले. चोरीला मज्जाव केला तर वाळू चोरटे धमकावतात. त्यांच्यावर एमपीडीए कायद्यानुसार ठोस कारवाई करावी, अशी मागणी आव्हाणे ता.जळगाव येथील ग्रामस्थ, शेतकरी यांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
निवेदन देताना राहुल सुभाष चौधरी, हुकूम दगडू चौधरी, गोपाल कालीदास चौधरी, संजय सुभाष पाटील, कांतीलाल शालीक पाटील, चंद्रकांत दिलीप जाधव, प्रदीप आधार पाटील, विठ्ठल जानकीराम पाटील, कपिल गोपाळ चौधरी, भगवान श्रीधर चौधरी, विक्रम श्रीधर चौधरी, निवृत्ती भगवान चौधरी, जगदीश धनसिंग चौधरी, मंगल अंकुश पाटील, नारायण पाटील, हर्षल पी.चौधरी आदी उपस्थित होते.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आव्हाणी ता.धरणगाव शिवारात आव्हाणे येथील शेतकर्‍यांची शेती आहे. शेतकरी गिरणा नदीतून एका पारंपरिक गाडरस्त्याने जातात. पण हा रस्ता वाळू व्यावसायिकांनी तोडला. वाळूची रात्रंदिवस उचल केली जाते. गुरुवारी एमएच १९ बीएम २३१३ व एमएच १९ झेड ९११९ यांचे मालक, चालक, मजुरांनी नदीमधील रस्ता तोडला. त्याचा जाब विचारला असता शेतकर्‍यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. वाळूचा बेसुमार उपसा झाल्याने मोठे खड्डे पडून पर्यावरण व जीवित हानी झाली आहे. याला जबाबदार कोण? या नदीमधील वाळू चोरीसंबंधी आव्हाणी व आव्हाणे येथील तलाठी फक्त बघ्याची भूमिका घेतात. वाळू चोर, डंपर, व्यावसायिकांवर कोणतीच कारवाई होत नाही. गाडरस्ता तोडल्याने शेतकर्‍यांना डोक्यावरून शेतमाल (कपाशी व इतर माल) आणावा लागतो. संबंधित वाळू व्यावसायिक, मजूर, चालकांवर एमपीडीए कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. वाळू चोरी थांबवावी. शेेतकर्‍यांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.

Web Title: Demand to sand commercial practitioners to get MPA, submit a request to the administration:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.