लगीनघाईत वाढली विवाह सेवांची मागणी; दिल्ली, मुंबईत सर्व सेवांसाठी सर्वाधिक मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 08:02 AM2021-12-26T08:02:55+5:302021-12-26T08:03:29+5:30
मुंबई, दिल्ली व चेन्नई या शहरांमध्ये बँक्वेट हॉल्ससाठी सर्वाधिक शोध घेण्यात आला. दिल्ली, मुंबई व कोलकाता या शहरांमध्ये मेकअप आर्टिस्ट्ससाठी सर्वाधिक शोध घेण्यात आला.
मुंबई : व्यवहार सुरळीत होत असताना विवाह सेवांच्या मागणी ४९.७ टक्क्यांनी वाढली. यात डीजेसाठी शोध दिल्लीमध्ये सर्वाधिक राहिला. त्यानंतर मुंबई व चेन्नईचा क्रमांक होता. दिल्ली, मुंबई व हैदराबाद या शहरांत वेडिंग प्लानर्ससाठी मागणी सर्वाधिक राहिली, असे एका संकेतस्थळाच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली.
मुंबई, दिल्ली व चेन्नई या शहरांमध्ये बँक्वेट हॉल्ससाठी सर्वाधिक शोध घेण्यात आला. दिल्ली, मुंबई व कोलकाता या शहरांमध्ये मेकअप आर्टिस्ट्ससाठी सर्वाधिक शोध घेण्यात आला. चेन्नई, दिल्ली व बंगळुरू या शहरांमध्ये वेडिंग ज्वेलरीसाठी मागणी सर्वोच्च राहिली. दिल्ली, हैदराबाद व मुंबई येथे वेडिंग बॅण्ड्ससाठी मागणीत वाढ झाली. काही नगरे व शहरांमधील मेकअप आर्टिस्ट्ससाठी शोध ४९ टक्क्यांनी वाढला, त्यात लखनऊ, चंदिगड व जयपूर या शहरांचा समावेश होता.
वेडिंग बॅण्ड्ससाठी मागणी १५२ टक्क्यांनी वाढली, यासंदर्भात लखनऊ, पटना व कानपूर अग्रस्थानी होते. फोटोग्राफर्सच्या संदर्भात लखनऊ, पटना व इंदोर मागणी वाढीमध्ये अग्रस्थानी होते. येथील शहरांमधील शोधांमध्ये ६७ टक्क्यांची वाढ झाली. पटना, जयपूर व लखनऊ येथे वेडिंग प्लानर्ससाठी मागणी उच्च होती. या शहरांमध्ये विशेष सेवांसाठी मागणी ३९ टक्क्यांनी वाढली. तर कोईम्बतूर व मदुराई, तसेच जयपूर या दक्षिणेकडील शहरांत वेडिंग ज्वेलरीसाठी मागणी सर्वाधिक होती.
काय आहे सर्वेक्षणात?
एक हजार भारतातील शहरांमध्ये बँक्वेट हॉल्स, मेकअप आर्टिस्ट्स, वेडिंग फोटोग्राफर्स, वेडिंग बॅण्ड्स, वेडिंग ज्वेलरी, डीजे आणि वेडिंग प्लानर्स अशा विवाह सेवांच्या ग्राहकांच्या मागण्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे.
फुलांची मागणी वाढली
फुलांच्या मागणीचा विचार करता चंदिगड, विशाखापट्टणम व म्हैसूर येथे फूलविक्रेत्यांचा सर्वाधिक शोध घेण्यात आला, तर एकूणच सर्व शहरांमधील विवाहासाठी फुलांची मागणी ३५ टक्क्यांनी वाढली.
पटना व लखनऊ येथे विवाहासंबंधित सर्व सेवांसाठी अधिक शोध घेण्यात आला. पटना, लखनऊ व गोरखपूरमध्ये बँक्वेट हॉलला सर्वाधिक मागणी होती. तर इंदोर, मंगळुरु व चंदिगड येथे केटरर्ससाठी सर्वाधिक शोध घेण्यात आला.