नामपूर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:40+5:302015-02-14T23:51:40+5:30
पंधरा जागा : २२ मार्च रोजी मतदान
Next
प धरा जागा : २२ मार्च रोजी मतदाननामपूर : नामपूर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे इच्छुकांच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्यांनी समन्वयातून संस्थेची निवडणूक बिनविरोध करून आदर्श निर्माण करावा, अशी मागणी सभासदांकडून व्यक्त होत आहे. संस्थेच्या १५ जागांसाठी २२ मार्च रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा सर्वसाधारण प्रवर्गाच्या दोन जागांची वाढ झाली आहे. सर्वसाधारण- १०, महिला प्रवर्ग- २, अनुसूचित जाती-जमाती- १, इतर मागास प्रवर्ग- १ व भटक्या जाती-जमाती- १ अशा १५ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० ऑक्टोबर २०१२ पर्यंत सभासद झालेले ८२० मतदार निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील. निवडणुकीच्या पहिल्या दिवशी (दि. १२) ३५ उमेदवारांनी नामांकनपत्र घेतले आहे. सोमवारपर्यंत (दि. १६) उमेदवारी अर्ज कार्यालयीन वेळेत दाखल करण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी १८ फेब्रुवारीला, तर माघारी ७ मार्च रोजी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एन. डी. गायकवाड यांनी सांगितले. २६ सप्टेंबर १९९१ रोजी नामपूर येथे प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची स्थापना झाली. बागलाण व देवळा तालुका कार्यक्षेत्र असलेल्या शिक्षक पतसंस्थेची वार्षिक उलाढाल सुमारे २० कोटी रुपयांची आहे. गेल्या १८ वर्षांपासून संस्थेवर प्राथमिक शिक्षक संघाची निर्विवाद सत्ता कायम आहे. राष्ट्रीय पातळीवरील सहकार कायदा अस्तित्वात आल्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला सुमारे अडीच वर्षांचा जादा कार्यकाळाचा बोनस मिळाला. यंदाच्या निवडणुकीत सत्तारूढ प्राथमिक शिक्षक संघ व प्राथमिक शिक्षक समिती अशा पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांनी सभासदांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे. निवडणुकीच्या माध्यमातून होणारी लाखो रुपयांची उधळपी रोखण्यासाठी निवडणूक बिनविरोध होणे गरजेची बाब आहे. संस्थेची आर्थिक स्थितीभागभांडवल- ७ कोटी ५८ लाखकर्जवाटप- १४ कोटी रुपयेनफा वाटणी- ७२ लाख रुपयेठेवी- ४ कोटी ५६ लाख रुपये