खुल्या बाजारात उडीद खरेदीची मागणी आठ हजारांवर भाव हवा : शेतकर्‍यांचे जळगाव बाजार समितीला आवाहन

By admin | Published: October 22, 2016 12:43 AM2016-10-22T00:43:27+5:302016-10-22T00:43:27+5:30

जळगाव : सध्या उडदाचे भाव पडले आहेत. अशा स्थितीत शेतकर्‍यांना सावरण्यासाठी राज्य मार्केटींग फेडरेशन व भारतीय अन्न महामंडळ यांनी खुल्या बाजारात उडदाची लिलाव पद्धतीने खरेदी करावी, अशी मागणी सरदार वल्लभभाई पटेल मित्र मंडळाने केली आहे.

Demand for urad purchase in open market will be Rs. 8,000 / - for the farmers. Jalgaon market committee appeals to farmers | खुल्या बाजारात उडीद खरेदीची मागणी आठ हजारांवर भाव हवा : शेतकर्‍यांचे जळगाव बाजार समितीला आवाहन

खुल्या बाजारात उडीद खरेदीची मागणी आठ हजारांवर भाव हवा : शेतकर्‍यांचे जळगाव बाजार समितीला आवाहन

Next
गाव : सध्या उडदाचे भाव पडले आहेत. अशा स्थितीत शेतकर्‍यांना सावरण्यासाठी राज्य मार्केटींग फेडरेशन व भारतीय अन्न महामंडळ यांनी खुल्या बाजारात उडदाची लिलाव पद्धतीने खरेदी करावी, अशी मागणी सरदार वल्लभभाई पटेल मित्र मंडळाने केली आहे.
मंडळाने याबाबत निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, अतिपावसाने पिके खराब झाली. त्यात काही शेतकर्‍यांनी आपले उडदाचे पीक कसेबसे वाचविले. यातच यंदा उडदाची फारशी आवक नाही. तरीदेखील जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाचे भाव पडलेले आहेत. बाजार समितीमधील पदाधिकार्‍यांची शेतकर्‍यांबाबतची जबाबदारी अधिक वाढली आहे. व्यापारी नफा कमवित आहेत. भाव सतत घसरत असल्याने मार्केटींग फेडरेशन व अन्न महामंडळ यांनी खुल्या बाजारामध्ये उतरून धान्य खरेदी करावी. मराठवाड्यामध्ये काही बाजार समित्यांमध्ये उडदाची खरेदी शासकीय यंत्रणांनी खुल्या बाजारामध्ये केली आहे. तसेच बाजार समितीने आपले संकेतस्थळ विकसित करून त्यावर रोजची आवक, मालाची प्रत आदी माहिती आपल्या संकेतस्थळावर टाकावी. यामुळे खरेदीसंबंधी प्रतिसाद मिळू शकतो. तसेच बाजारामध्ये स्पर्धा वाढू शकते. त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळेल.
बाजार समितीने सरदार पटेल मित्र मंडळाच्या मागणीचा विचार करून खरेदी सुरू करावी, अशी मागणी मंडळाचे किशोर चौधरी, पिंटू नारखेडे, महेश भोळे, संजय ढाके, मिलिंद चौधरी, संजय चिरमाडे, जितेंद्र भोळे, ज्ञानदेव चौधरी, शरद नारखेडे आदींनी केली आहे.

Web Title: Demand for urad purchase in open market will be Rs. 8,000 / - for the farmers. Jalgaon market committee appeals to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.