‘ईपीएफ’वरील कर मागे घेण्याची मागणी
By admin | Published: March 4, 2016 02:25 AM2016-03-04T02:25:20+5:302016-03-04T02:25:20+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ईपीएफ हा कर्मचाऱ्यांचा सुरक्षित निधी असून त्यावर कर आकारणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत हा प्रस्तावित कर मागे घेण्याची मागणी केली.
Next
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ईपीएफ हा कर्मचाऱ्यांचा सुरक्षित निधी असून त्यावर कर आकारणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत हा प्रस्तावित कर मागे घेण्याची मागणी केली.
६० टक्के कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(ईपीएफ) काढून घेण्यावर कर आकारण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करीत राहुल गांधी यांनी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा आवाज बुलंद केला आहे.
हा कर मागे घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी करावी, अशी विनंती मी करणार आहे, असे त्यांनी संसद भवनात पत्रकारांशी बोलतांना सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)