पगार मागितला, एअरपोर्टवर तरुणींनी केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 08:45 AM2022-09-21T08:45:58+5:302022-09-21T08:47:14+5:30

दिनेश गुप्ता असे या तरुणाचे नाव असून, तो विमानतळावरील राहुल ट्रॅव्हल्समध्ये टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायचा.

Demanded salary, brutally beaten by young women at airport | पगार मागितला, एअरपोर्टवर तरुणींनी केली बेदम मारहाण

पगार मागितला, एअरपोर्टवर तरुणींनी केली बेदम मारहाण

googlenewsNext

रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ६-७ तरुणींनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. शिवीगाळ करत त्याचा शर्ट फाडला, इतकंच काय तर अमानुषपणे पट्ट्यानेही त्याला सपासप मारलं, शिवाय पेपर स्प्रेही चेहऱ्यावर फवारला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर तरुणाने थकलेल्या पगाराची मागणी केली होती, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

दिनेश गुप्ता असे या तरुणाचे नाव असून, तो विमानतळावरील राहुल ट्रॅव्हल्समध्ये टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायचा. दीड महिन्यापूर्वी त्याने नोकरी सोडली. मे आणि जून महिन्याचा पगार मागण्यासाठी तो आला होता; पण ऑफिसमधील तरुणींनी बेदम मारहाण केल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, मारहाण करणाऱ्या तरुणींविरोधात नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

Web Title: Demanded salary, brutally beaten by young women at airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.