देमचोक, पेंगाँग भागातील गावे खाली करण्याचे लष्काराचे आदेश, सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 12:07 PM2020-06-18T12:07:49+5:302020-06-18T12:17:54+5:30

सीमेवर चीनने आपल्या सैन्यात वाढ केल्यानंतर भारताने गलवान घाडी, दौलत बेग ओल्डी, चुशुल आणि देपसांगमध्ये अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सुत्रांनी सांगितले.

demchok and pegong villages are being evacuated in east ladakh sources | देमचोक, पेंगाँग भागातील गावे खाली करण्याचे लष्काराचे आदेश, सूत्रांची माहिती

देमचोक, पेंगाँग भागातील गावे खाली करण्याचे लष्काराचे आदेश, सूत्रांची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय लष्कराने लडाखमध्ये जवानांच्या संख्येत वाढ केली आहे. सीमावर्ती भागातील मोबाईल कनेक्टिव्हिटी बंद केली असून लोकांसाठी श्रीनगर लेह- महामार्ग बंद करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: लडाखच्या गलवान खोऱ्यात वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर तणाव वाढला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने पूर्व लडाख येथील देमचोक आणि पेंगाँगमधील गावे खाली करण्यास सांगितले आहे. 

याशिवाय, भारतीय लष्कराने लडाखमध्ये जवानांच्या संख्येत वाढ केली आहे. तसेच, सीमावर्ती भागातील मोबाईल कनेक्टिव्हिटी बंद केली असून लोकांसाठी श्रीनगर लेह- महामार्ग बंद करण्यात आला आहे.

आता कुरापती केल्यास चीनला योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान सज्ज आहेत. सीमेवर चीनने आपल्या सैन्यात वाढ केल्यानंतर भारताने गलवान घाडी, दौलत बेग ओल्डी, चुशुल आणि देपसांगमध्ये अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सुत्रांनी सांगितले.

भारतावर दबाव वाढविण्यासाठी चीन पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा आपले सैन्य तैनात करण्याची शक्यता भारतीय लष्कराला आहे. भारत एलएसीवरील फायरिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यासंबंधी विचार करत आहे. 

दुसरीकडे, हवाई दल आणि नौदलाचे जवान सुद्धा हाय अलर्टवर आहेत. चीनने सुद्धा सीमेवर आपल्या सैनिकांची तैनात वाढली आहे. भारत-चीन सीमेवरील वाद सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, परंतु अद्याप सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण आहे.

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये गेल्या सोमवारी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे.
 

आणखी बातम्या...

CoronaVirus News : चिंता वाढली! गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ

भारताची चीनला घेरण्याची तयारी, सीमेवर जवान सतर्क, रस्ता बांधणीला वेग

कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"

India China FaceOff : भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला सुनावले, म्हणाले...

India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह

दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव

Web Title: demchok and pegong villages are being evacuated in east ladakh sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.