आमच्या नसानसांमध्ये लोकशाही, ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 07:27 AM2023-01-30T07:27:03+5:302023-01-30T07:27:26+5:30

Mann Ki Baat: आमच्या नसानसांमध्ये लोकशाही असून, भारत ही लोकशाहीची आई असल्याचे मत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नववर्षातील पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात व्यक्त केले.

Democracy in our hands, PM Modi's opinion in 'Mann Ki Baat' | आमच्या नसानसांमध्ये लोकशाही, ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांचे मत

आमच्या नसानसांमध्ये लोकशाही, ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांचे मत

Next

नवी दिल्ली : आमच्या नसानसांमध्ये लोकशाही असून, भारत ही लोकशाहीची आई असल्याचे मत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नववर्षातील पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, देशांतर्गत दाखल केलेल्या पेटंटची संख्या परदेशात दाखल केलेल्या पेटंटपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारतासाठी “तंत्रज्ञान दशक” ठरण्याचे स्वप्न पूर्ण नवोन्मेषकांमुळे पूर्ण होईल.

देशांतर्गत वाढलेले पेटंट देशाच्या वाढत्या वैज्ञानिक क्षमता अधोरेखित करते, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. तंत्रज्ञानाच्या विकासाच्या या दशकासाठी पंतप्रधानांनी यापूर्वीच ‘तंत्रज्ञान दशक’ हा शब्द वापरला आहे. यातील अनेक तंत्रज्ञानाचा शोध भारतात लागला आहे.
७व्या क्रमाकांवर भारत जगात पेटंट दाखल करण्याच्या बाबतीत आहे तर ५० टक्क्यांनी भारताच्या पेटंट नोंदणीत गेल्या पाच वर्षांत वाढ झाली असल्याचे मोदींनी म्हटले.

‘पद्म’ पुरस्कार विजेत्यांचा उल्लेख 
यंदा मोठ्या संख्येने पद्म पुरस्कार विजेते आदिवासी समुदाय आणि आदिवासी समाजाशी संबंधित लोक आहेत. आदिवासी जीवन शहरी जीवनापेक्षा वेगळे आहे, त्याला स्वतःची आव्हानेदेखील आहेत. एवढे असूनही आदिवासी समाज आपल्या परंपरा जपण्यासाठी नेहमीच तत्पर असतो. टोटो, हो, कुई, कुवी आणि मांडा यांसारख्या अनेक महान व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले आहेत, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे, असे मोदी म्हणाले.

Web Title: Democracy in our hands, PM Modi's opinion in 'Mann Ki Baat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.