जि.प.समोर धरणे आंदोलन
By admin | Published: March 22, 2016 12:41 AM2016-03-22T00:41:52+5:302016-03-22T00:41:52+5:30
जळगाव- सफाई कामगरांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सोमवारी जि.प.समोर अंत्योदय कामगार परिषदेच्या नेतृत्वामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. कामगारांनी विविध मागण्या केल्या. त्यात सफाई कामगारांना १२ वर्षानंतरची पहिली व २४ वर्षानंतरची दुसरी कालबद्ध पदोन्नती द्यावी, वारस हक्कानो नोकरीचे प्रस्ताव मार्गी लावावेत, रिक्त पदे भरण्यात यावीत, येवती ता.बोदवड येथील सफाई कामदार रवींद्र सुरवाडे यांच्याकडून जादा घरभाडे वसूल केले आहे. ती रक्कम परत मिळावी, वेतन विलंबाने होते, जीपीएफची प्रकरणे तीन महिने प्रलंबित असतात, रक्कम लवकर मिळत नाही आदी मागण्या केल्या. आंदोलनात कर्मचारी महासंघाचे मंगेश बाविस्कर, उपाध्यक्ष प्रतिभा सुर्वे, राजेश गोयर, पिंटू तोडकर, किशोर सोलंकी, रमेश जावळे, अशोक सोनवणे, ज्ञानेश्वर जाधव आदींनी सहभाग घेतला.
Next
ज गाव- सफाई कामगरांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सोमवारी जि.प.समोर अंत्योदय कामगार परिषदेच्या नेतृत्वामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. कामगारांनी विविध मागण्या केल्या. त्यात सफाई कामगारांना १२ वर्षानंतरची पहिली व २४ वर्षानंतरची दुसरी कालबद्ध पदोन्नती द्यावी, वारस हक्कानो नोकरीचे प्रस्ताव मार्गी लावावेत, रिक्त पदे भरण्यात यावीत, येवती ता.बोदवड येथील सफाई कामदार रवींद्र सुरवाडे यांच्याकडून जादा घरभाडे वसूल केले आहे. ती रक्कम परत मिळावी, वेतन विलंबाने होते, जीपीएफची प्रकरणे तीन महिने प्रलंबित असतात, रक्कम लवकर मिळत नाही आदी मागण्या केल्या. आंदोलनात कर्मचारी महासंघाचे मंगेश बाविस्कर, उपाध्यक्ष प्रतिभा सुर्वे, राजेश गोयर, पिंटू तोडकर, किशोर सोलंकी, रमेश जावळे, अशोक सोनवणे, ज्ञानेश्वर जाधव आदींनी सहभाग घेतला.