सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निदर्शने भाजपा : महिलांचा अवमान केल्याचा आरोप
By admin | Published: October 6, 2016 09:20 PM2016-10-06T21:20:10+5:302016-10-06T21:20:10+5:30
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांचा एकेरी उल्लेख करणार्या राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माफी मागावी या मागणीसाठी आक्रमक होत भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना महिलांची नळावरील भांडणे असा उल्लेख करणार्या सुप्रिया सुळे यांनी महिलांचा अवमान केला असून, त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणीही आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे.

सुळे या बुधवारी नाशिकमध्ये आल्या असता त्यांनी मुख्यमंत्री चीडचीड करतात, अशी टीका केली होती. यापूर्वी अहमदनगर आणि अन्य ठिकाणीही त्यांनी अशीच टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी सुप्रिया सुळे माफी मागा, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आमदार फरांदे यांनी मोर्चेकर्यांसमोर बोलताना सुप्रिया सुळे यांनी महिलांचा अवमान केला असून, हातातून सत्ता गेल्याने त्याच चीडचीड करीत आहेत, अशी टीका केली.
यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात भाजपाचे शहर सरचिटणीस सुरेश पाटील, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे तसेच भाजयुमोचे अध्यक्ष अजिंक्य साने, अमित घुगे, रोहिणी नायडू, देवदत्त जोशी, सुजाता करजगीकर, भारती बागुल, उत्तमराव उगले, पवन भगूरकर, चंद्रशेखर पंचाक्षरी, दिगंबर धुमाळ, विजय गायखे, दिनेश अहिरे, ॲड. प्रसाद महाले, सुमित नहार, राहुल पंडित, स्मीता बोडके, विजय बिरारी, हिमगौरी आडके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपाचा कांगावा प्रसिद्धीसाठी
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांचा कोणताही अवमान केला नसताना भाजपाच्या वतीने चुकीचे आंदोलन करण्यात येत आहे. भाजपाच केवळ सवंग प्रसिद्धीसाठी अशाप्रकारचे आंदोलन करीत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांनी केला आहे.