हैदराबाद विद्यापीठात कुलगुरुंविरोधात निदर्शन
By admin | Published: March 22, 2016 12:03 PM2016-03-22T12:03:47+5:302016-03-22T12:05:08+5:30
कुलगुरु आप्पा राव यांनी तब्ब्ल 2 महिन्यानंतर पुन्हा पदभार स्विकारला. विद्यार्थ्यांनी आप्पा राव यांच्या कार्यालयाची तोडफोड करत आपला राग व्यक्त केला
Next
ऑनलाइन लोकमत -
हैदराबाद, दि, २२ - रोहीत वेमुला आत्महत्या प्रकरणावरुन विद्यार्थ्यांमध्ये असलेला संताप अजून कायम आहे. मंगळवारी हैदराबाद विश्वविद्यापाठीचे कुलगुरु आप्पा राव कामावर रुजू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरोधात निदर्शन केलं. कुलगुरु आप्पा राव यांनी तब्ब्ल 2 महिन्यानंतर पुन्हा पदभार स्विकारला. विद्यार्थ्यांनी आप्पा राव यांच्या कार्यालयाची तोडफोड करत आपला राग व्यक्त केला. यावेळी त्यांनी खुर्च्या, कुंड्यांची तोडफोड केली.कुलगुरुंना पदावरुन हटवण्याच्या मागणीवर विद्यार्थी अजूनही कायम आहेत.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर अडचणीत आलेले कुलगुरु आप्पा राव मोठ्या सुट्टीवर गेले होते. आप्पा राव यांच्या अनुपस्थितीत वरिष्ठ प्राध्यापक विपिन श्रीवास्तवर हे कुलगुरुंचा प्रभार सांभाळतील अशी माहिती हैदराबाद विश्वविद्यापीठाकडून देण्यात आली होती. आप्पा राव यांना पदावरुन हटवण्यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले होते. कुलगुरुंना पदावरुन हटवण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम असून त्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं होतं.
रोहीत वेमुला याने आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये माझ्या आत्महत्येला कोणी जबाबदार नसल्याचं लिहिलं होतं. मात्र आत्महत्येच्या एक महिना अगोदर रोहितने कुलगुरु आप्पा राव यांना पत्र लिहिलं होतं ज्यामध्ये कॅम्पसमधील दलित विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यासाठी दोरी द्यावी असं म्हंटलं होतं.
Hyderabad University students protesting at VC's lodge vandalise the venue where VC Appa Rao was present. pic.twitter.com/UEopsdOQ0q
— ANI (@ANI_news) March 22, 2016
Hyderabad University students protesting at VC's lodge vandalise the venue where VC Appa Rao was present. pic.twitter.com/ilx7Iszm0M
— ANI (@ANI_news) March 22, 2016