भविष्य निर्वाह निधीच्या नव्या नियमाविरोधात बंगळुरूमध्ये निदर्शनं, अनेक गाड्यांची जाळपोळ

By admin | Published: April 19, 2016 05:57 PM2016-04-19T17:57:30+5:302016-04-19T18:07:51+5:30

भविष्य निर्वाह निधीच्या पैसे काढण्यासंदर्भातील नव्या नियमाविरोधात सरकारी कर्मचा-यांनी निदर्शनं केली आहेत.

Demonstrations in Bangalore against new rules for subsistence fund | भविष्य निर्वाह निधीच्या नव्या नियमाविरोधात बंगळुरूमध्ये निदर्शनं, अनेक गाड्यांची जाळपोळ

भविष्य निर्वाह निधीच्या नव्या नियमाविरोधात बंगळुरूमध्ये निदर्शनं, अनेक गाड्यांची जाळपोळ

Next

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. १९- भविष्य निर्वाह निधीच्या पैसे काढण्यासंदर्भातील नव्या नियमाविरोधात सरकारी कर्मचा-यांनी निदर्शनं केली आहेत. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी यावेळी हवेत गोळीबारही केला. यावेळी संतप्त आंदोलकांनी पार्किंगमधल्या अनेक गाड्यांची जाळपोळ केली.

उत्तर बंगळुरूतल्या यशवंतपूरमध्येही आंदोलकांनी गाड्यांची जाळपोळ केली आहे. आंदोलकांनी कर्नाटका आणि तामिळनाडूला जोडणा-या  दक्षिण पूर्व महामार्गावरही रास्ता रोको केला. त्यामुळे म्हैसूर रोड, तुमकूर रोड, बेनरघाट रोड आणि शहरातल्या इतर भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती.

यावेळी आंदोलकांनी या रस्त्यांवरील मोठ्या कंपन्यांवरही हल्लाबोल केला. आंदोलकांनी गाड्यांवर दगडफेकही केली. सकाळी 9.30 वाजता आंदोलकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. जवळपास 4 तासांनी म्हणजेच दुपारी 1 नंतर पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यास यश आलं आहे.
 

Web Title: Demonstrations in Bangalore against new rules for subsistence fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.