सरकारचा मोठा निर्णय, देशातील 'या' तीन बँकांचे विलिनीकरण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 07:16 PM2018-09-17T19:16:27+5:302018-09-17T19:20:34+5:30
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली होती, त्यानुसार बँकांचे एकीकरण हे सरकारच्या अजेंड्यावर होते. त्यादृष्टीने सरकारने उचललेले हे पहिले पाऊल असल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री अरुण जेटली
नवी दिल्ली - देशातील महत्वाच्या बँकांपैकी एक असलेल्या देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अर्थखात्याचे सचिव राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली. आम्ही देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचे कुमार यांनी सांगितले. या विलिनीकरणानंतर ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक ठरणार असल्याचेही कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली होती, त्यानुसार बँकांचे एकीकरण हे सरकारच्या अजेंड्यावर होते. त्यादृष्टीने सरकारने उचललेले हे पहिले पाऊल असल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्यादृष्टीनेही हा निर्णय योग्य असल्याचे समर्थन जेटलींनी केले आहे. तर, बँकींग क्षेत्रात सुधारणांची गरज असून सरकारकडून बँकांतील भांडवलाची गरज लक्षात घेतली जात आहे. जेथपर्यंत एनपीएचा प्रश्न उद्भवतो, तिथपर्यंत असे धाडसी निर्णय घेताना सरकार गंभीर असल्याचेही राजीव कुमार यांनी म्हटले.
We have decided to merge Dena Bank, Vijaya Bank and Bank of Baroda.
— ANI (@ANI) September 17, 2018
Merger of the 3 banks will make this the third largest bank of the country: Financial Services Secretary Rajiv Kumar pic.twitter.com/u7TZs0jOeg
Real picture of Non Performing Assets(NPAs) was only known in 2015, the UPA had swept NPAs under the carpet: FM Arun Jaitley pic.twitter.com/TGYVwFNVzK
— ANI (@ANI) September 17, 2018