नियोजित वराने नाकारल्याने इरेला पेटलेली जेनिफर बनली सौंदर्यवती

By admin | Published: April 30, 2017 12:42 AM2017-04-30T00:42:44+5:302017-04-30T00:42:44+5:30

लठ्ठपणा कोणालाही त्रस्त करू शकतो. अनेक लोक तर लठ्ठपणामुळे घरातून बाहेर पडणेच बंद करतात. ब्रिटनमधील लिंकनशायरमधील २४ वर्षीय जेनिफर अ‍ॅडकीन हिला

Denied by the top decision, | नियोजित वराने नाकारल्याने इरेला पेटलेली जेनिफर बनली सौंदर्यवती

नियोजित वराने नाकारल्याने इरेला पेटलेली जेनिफर बनली सौंदर्यवती

Next

नवी दिल्ली : लठ्ठपणा कोणालाही त्रस्त करू शकतो. अनेक लोक तर लठ्ठपणामुळे घरातून बाहेर पडणेच बंद करतात. ब्रिटनमधील लिंकनशायरमधील २४ वर्षीय जेनिफर अ‍ॅडकीन हिला लठ्ठपणाची मोठी किंमत चुकवावी लागली. जेनिफरचे वजन १0८ किलो होते. तिच्या नियोजित वराने लग्नाला नऊ महिने बाकी असताना तिच्याशी ब्रेकअप केला. ही बाब जेनिफरला भयंकर लागली. तिने या घटनेला एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि काही महिने कठोर परिश्रम करून ती स्लीम-ट्रीम झाली. तिने आपला लूक इतका बदलला की तिचे रूपांतर एका सौंदर्यवतीत झाले. जेनिफरचे नवे रूप पाहून तिच्या माजी नियोजित वराला आता लग्न मोडल्याबद्दल नक्कीच पश्चात्ताप होत असणार. आपले लग्न मोडल्यामुळे जेनिफर उदास झाली होती. या घटनेवरून लक्ष वळविण्यासाठी तिने आणखी जास्त जंक फूड खायला सुरुवात केली; मात्र तिला लवकरच वजन कमी करण्याची गरज असल्याचे लक्षात आले. तिने जीम जॉईन केले. जेवणातही केवळ आरोग्यवर्धक पदार्थच ठेवले. त्याचा योग्य तो परिणाम झाला. जेनिफरचे वजन आता चक्क ६0 किलो झाले आहे.
जेनिफर आता पुढील महिन्यात होत असलेल्या मिस जेटिंग शेफिल्ड सौंदर्य स्पर्धेत भाग घेत आहे. तिने टॉप-१0 सौंदर्यवतींत स्थान मिळविले आहे. येथे जिंकल्यास ती मिस इंग्लंड आणि पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेत जाऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे आता जेनिफरला नवा प्रियकरही मिळाला आहे. त्यामुळे ती आता खुश आहे.

Web Title: Denied by the top decision,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.