१५ राज्यांत दाट धुके... समोरचे काहीच दिसेना; दिल्लीत १५० उड्डाणे, १४ रेल्वेंना उशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 05:57 AM2023-12-27T05:57:13+5:302023-12-27T05:58:07+5:30
१२ विमाने जयपूर, लखनौकडे वळवली.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): देशात थंडीच्या कडाक्याबरोबरच धुक्याची चादरही पसरली आहे. मंगळवारी १५ राज्ये थंडी व दाट धुक्याच्या विळख्यात गेली आहेत. दिल्ली, पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओडिशाच्या काही ठिकाणी दृश्यमानता शून्य झाली आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कमी दृश्यमानतेमुळे १२० उड्डाणांना फटका बसला आहे.
वाह ‘फॉग’
नवीन वर्षाच्या निमित्ताने ताजमहाल पाहण्यासाठी पर्यटक आग्रा येथे येत आहेत; पण ताजमहाल धुक्यात लपल्यामुळे त्यांना ‘वाह ताज’ऐवजी ‘वाह फॉग’ म्हणण्याची वेळ आली. मंगळवारी येथे दृश्यमानता ५० मीटरपेक्षा कमी होती. दिल्लीत थंडीच्या लाटेमुळे बहुतांश भाग धुक्याच्या सावटाखाली आहेत.