दगडफेक प्रकरणात आरोपींचा जामीन नाकारला कारागृहात रवानगी : जिल्हा पेठ पोलीस घेणार आज ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2016 10:28 PM2016-06-30T22:28:20+5:302016-06-30T22:28:20+5:30

जळगाव: गोलाणी मार्केटमधील दगडफेक प्रकरणातील १३ आरोपींची गुरुवारी कारागृहात रवानगी केली. दरम्यान, न्यायालयीन कोठडी जाहीर झाल्यानंतर सर्वांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला. नियमित कोठडीची मुदत संपल्यानंतर तपासाधिकारी आशिष रोही यांनी सर्वांना न्या.प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले होते.

Denying the bail plea of ​​the accused in the stone-pelting case | दगडफेक प्रकरणात आरोपींचा जामीन नाकारला कारागृहात रवानगी : जिल्हा पेठ पोलीस घेणार आज ताबा

दगडफेक प्रकरणात आरोपींचा जामीन नाकारला कारागृहात रवानगी : जिल्हा पेठ पोलीस घेणार आज ताबा

Next
गाव: गोलाणी मार्केटमधील दगडफेक प्रकरणातील १३ आरोपींची गुरुवारी कारागृहात रवानगी केली. दरम्यान, न्यायालयीन कोठडी जाहीर झाल्यानंतर सर्वांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला. नियमित कोठडीची मुदत संपल्यानंतर तपासाधिकारी आशिष रोही यांनी सर्वांना न्या.प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले होते.
मोहसीन शब्बीर बागवान (वय २३ रा.जोशी पेठ), मोहम्मद बिलाल मो.फारुख शेख (वय २८ रा.मास्टर कॉलनी), इम्रान खान अब्दुल खान (वय २३ रा. हुडको, पिंप्राळा), वसीम खान अब्दुल खान (वय २३ रा.हुडको, पिंप्राळा), अमीर अली मो.अली सैयद (वय २४ रा.शिवाजी नगर),कलीम सैयद जुबेर अली (वय ४५शिवाजी नगर), दानेश नासीर हुसेन शेख (वय १९ रा.इस्लामपुरा) अमीर अली मोहम्मद अली सैयद (वय २४ रा.शिवाजी नगर),ऐनोद्दीन आमिनोद्दीन शेख (वय ३४ रा.शाहू नगर),खान सलमान सलीम (वय १८ रा.उस्मानिया पार्क), अल्तमश गुलाम रसूल खाटीक (वय १८ रा.गेंदालाल मील), मोहम्मद जुबेर अब्दुल रहीम खाटीक (वय २१ रा.गेंदालाल मील), शेख जाकीर शेख शकील (वय १९ रा.गेंदाला मील) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.डॉ.मोबीन अशरफी व डॉ.पिरजादे हे गुन्हा घडल्यापासून फरार आहेत. या सर्व आरोपींवर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात जमाव जमवून घोषणाबाजी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणात जिल्हा पेठ पोलिसांनी या आरोपींचा ताबा मिळावा म्हणून न्यायालयाकडे अर्ज सादर केला आहे. तो अर्ज मंजूर करण्यात आला असून शुक्रवारी त्यांना न्यायालयाच्या माध्यमातून जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

Web Title: Denying the bail plea of ​​the accused in the stone-pelting case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.