धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 04:37 PM2024-11-26T16:37:05+5:302024-11-26T16:38:48+5:30
एका महिला सफाई कर्मचाऱ्याने गावच्या सरपंचाला चपलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
यूपीच्या देवरियामध्ये एका महिला सफाई कर्मचाऱ्याने गावच्या सरपंचाला चपलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सध्या पोलिसांनी सरपंचाच्या तक्रारीवरून महिला सफाई कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी विभागाने महिलेला निलंबित केलं आहे.
सफाई कर्मचारी शीला देवी हिनेही सरपंच रवी प्रताप सिंह यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात विनयभंग आणि मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. हजेरी रजिस्टरवर सही न केल्याने सरपंचाचा महिलेचा राग होता, असे सांगण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणामध्ये ADPRO श्रावण चौरसिया यांनी सांगितलं की, एका महिला सफाई कर्मचाऱ्याने गावातील सरपंचाला चपलेने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एडीओ पंचायत यांच्याकडून तपास करण्यात आला. तपासाअंती, एडीओ पंचायतीला हे सत्य असल्याचं आढळून आलं. महिला सफाई कर्मचाऱ्याचं वर्तन नियमांविरुद्ध आहे. दोषी आढळल्यानंतर तिला निलंबित करण्यात आलं.
देवरियाच्या पथरदेव विकास गटांतर्गत नेरुवारी गावात दोन सफाई कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ज्यामध्ये शीला नावाची महिलाही आहे. शीला वेळेवर ड्युटीवर येत नसल्याचा आरोप आहे. याबाबत सरपंच रवी प्रताप सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर शीला संतापली.
२२ नोव्हेंबर रोजी महिला सफाई कर्मचारी आपल्या पे रोलवर सही घेण्यासाठी सरपंचाच्या घरी पोहोचली. यावर सरपंचाने ड्यूटी किती वाजता आहे अशी विचारणा केली. तर महिलेने रात्री ११ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत असल्याचं सांगितलं. हे उत्तर ऐकून सरपंचांनी ही बाब विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लिहून घ्यावी, असं सांगितल, कारण, ही कामाची वेळ नाही.
हे ऐकून महिला सफाई कर्मचारी शीला हिला राग आला आणि तिने चप्पल काढून सरपंचाला मारहाण केली, असा आरोप आहे. घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती विभागाला दिली आणि पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.