धक्कादायक! ...म्हणून चिमुकल्यावर आली आईसह रुग्णालयात स्ट्रेचर ओढण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 03:06 PM2020-07-20T15:06:45+5:302020-07-20T17:11:12+5:30
एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर आपल्या आईसह रुग्णालयात स्ट्रेचर ओढण्याची वेळ आल्याची घटना घडली आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांना लवकर शोधून काढणे व संसर्ग झालेल्यांचे प्राण वाचविणे या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. देशातील विविध ठिकाणी कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. मात्र याच दरम्यान काही घटना समोर येत आहेत अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये घडली आहे.
कोरोनाच्या संकटात रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर आपल्या आईसह रुग्णालयात स्ट्रेचर ओढण्याची वेळ आल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील एका रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात रुग्णांना घेऊन गेल्यावर स्ट्रेचरवरून नेण्यासाठी पैसे मागितले जातात. मात्र ते न दिल्यामुळे एका महिलेला तिच्या लहान मुलासह स्ट्रेचर ओढावा लागला आहे.
कंधे छोटे हैं लेकिन प्यार माँ से अधिक है,
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) July 20, 2020
आत्मनिर्भरता का और उदहारण दिखाएं या ये ठीक है?
ज़िला अस्प्ताल : देवरिया pic.twitter.com/TbT8nqe2hI
मिळालेल्या माहितीनुसार, बिंदू यादव असं या महिलेचं नाव आहे. बिंदू यांच्या साठ वर्षीय वडिलांना काही लोकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत वडिलांच्या हात-पायांना दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना जिल्ह्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हात आणि पायांना फॅक्चर झाले आहे. वॉर्डमधून ड्रेसिंग करून घेण्यासाठी त्यांना जावे लागते. मात्र याच वेळी स्टेचर खेचण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी पैशाची मागणी करतात. गरीब असल्याने आमच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे मी आणि माझा चार वर्षाचा मुलगा स्ट्रेचर ओढतो अशी माहिती महिलेने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : धक्कादायक! जोरदार पावसात 'ती' जमिनीवर होती पडून पण कोणीच केली नाही मदतhttps://t.co/6mNcO0wxs7#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 20, 2020
बिहारच्या सिवान जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक भयंकर घटना समोर आली. रुग्णालयाबाहेर एक महिला भर पावसात कित्येक तास जमिनीवर पडून होती. मात्र कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही. एका ट्विटर युजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या धक्कादायक घटनेचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यानंतर ही घटना समोर आली रुग्णालयाबाहेर जमिनीवर पडून असलेल्या या महिलेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ही घटना वेगाने पसरल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतले. तसेच तिच्यावर उपचार सुरू केले आहेत. तिची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची देखील माहिती दिली आहे.
CoronaVirus News : स्मशानभूमी बाहेर रुग्णवाहिकेच्या लांबच लांब रांगाhttps://t.co/bQa16HbQKu#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 19, 2020
महत्त्वाच्या बातम्या
"पवार साहेब, मोदी-शाह तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते तर देशाची ही अवस्था झाली नसती"
CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना रुग्णालयात डुक्करांचा मुक्त संचार; Video जोरदार व्हायरल
Assam Floods : आसामला पुराचा तडाखा, तब्बल 110 जणांचा मृत्यू
CoronaVirus News : इथे ओशाळली माणुसकी! ...अन् रुग्णालयाबाहेर भर पावसात कित्येक तास पडून होती महिला