विद्यार्थी सुखावले : महिन्यातून दोन शनिवारी दप्तराला सुटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 07:08 AM2019-07-30T07:08:25+5:302019-07-30T07:08:31+5:30

विद्यार्थी सुखावले : जगनमोहन सरकारचा निर्णय; विद्यार्थी मोकळ्या वातावरणात घेणार शिक्षण

Departments depart on two Saturdays in Andhra Pradesh | विद्यार्थी सुखावले : महिन्यातून दोन शनिवारी दप्तराला सुटी

विद्यार्थी सुखावले : महिन्यातून दोन शनिवारी दप्तराला सुटी

Next

विजयवाडा : आंध्र प्रदेशातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर आता दर महिन्याच्या पहिल्या व तिसºया शनिवारी दप्तराचे ओझे असणार नाही. विद्यार्थ्यांना मोकळ्या वातावरणात शिक्षण घेता येण्यासाठी आंध्र प्रदेशमधील जगनमोहन सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील सर्व खासगी व सरकारी शाळांसाठी बंधनकारक आहे.

या निर्णयाचे पालक, विविध शाळा, शिक्षक तसेच शिक्षणक्षेत्रातील अनेक संघटनांनी स्वागत केले आहे. विनादप्तर दिनाची संकल्पना पालक, विद्यार्थ्यांना नीट समजावून सांगावी असा आदेश राज्य सरकारने सर्व शाळांना दिला आहे. विद्यार्थी अभ्यासाच्या ओझ्याखाली दबून गेले आहेत. या रगाड्यात ते खेळण्याचेही अनेकदा विसरून जातात. पाठीवरील वजनदार दप्तरामुळे अनेक मुलांना पाठीचे, मानेचे आजारही जडतात. या गोष्टींपासून वाचण्यासाठी मुलांना विनादप्तर दिन अत्यंत उपयोगी ठरणार असल्याची प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली आहे. कृष्णा जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी एम. व्ही. राज्यलक्ष्मी यांनी सांगितले की, विनादप्तर दिनामुळे विद्यार्थ्यांना अधिक मोकळेपणाने शिक्षण घेता येईल. 

माध्यमिक स्तरालाही लागू करा

च्केवळ प्राथमिक स्तरावरीलच नव्हे तर माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठीही विनादप्तर दिनाचा निर्णय लागू करावा अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय)चे राज्य सहसचिव एस. नरसिंहम यांनी केली आहे.
च्विनादप्तर दिन निर्णयाची खासगी शाळांतून नीट अंमलबजावणी होत आहे का याकडेही सरकारने बारीक लक्ष ठेवावे असे दुसºया इयत्तेत शिकणाºया एका मुलाचे वडील बाथिना रघुराम यांनी
सांगितले.

च्मुलांच्या दप्तराचे वजन कमी करण्याची गरज आहे असे पत्र कृष्णा जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष बी. व्ही. एस. कुमार यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना लिहिले होते.

च्माझ्या दप्तरात किमान वीस वह्या-पुस्तके असतात. ते ओझे घेऊन शाळेत येताना व घरी परत जाताना माझी दमछाक होते. आता महिन्यातून दोन दिवस तरी त्यातून आमची सुटका होईल.

च्आपल्या सूचनेनुसार निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. पी. सृजना या पाचवी इयत्तेतील विद्यार्थीनीने सांगितले की, विनादप्तर दिनाच्या दिवशी पाठीवर कोणतेही ओझे न घेता मला शाळेत यायला मिळणार आहे.

Web Title: Departments depart on two Saturdays in Andhra Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.