सावळ्या रंगामुळे लोक टोमणे मारायचे; १७ वर्षीय तरुणाची १५व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 10:21 AM2021-03-08T10:21:23+5:302021-03-08T10:28:25+5:30

लोकांच्या टोमण्यांमुळे १७ वर्षीय मुलगा तणावाखाली होता; लोकांच्या टोमण्यांमुळे त्यानं आत्महत्या करून जीवन संपवलं

Depressed Over His Looks 17 year old Boy Jumps to Death From 15th Floor in noida | सावळ्या रंगामुळे लोक टोमणे मारायचे; १७ वर्षीय तरुणाची १५व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या 

सावळ्या रंगामुळे लोक टोमणे मारायचे; १७ वर्षीय तरुणाची १५व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या 

Next

नोएडा: सावळ्या रंगामुळे निराश असलेल्या अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. उत्तर प्रदेशातल्या नोएडामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सावळ्या रंगामुळे त्रासलेल्या तरुणानं मॉडर्न सोसायटीच्या १५ व्या मजल्यावरून आत्महत्या करून जीवन संपवलं. सोसायटीतले मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना त्यांनी मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली. संयम असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो १७ वर्षांचा होता. त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी किंवा पत्र लिहिलेलं नाही.

कर्नाटकच्या 'सेक्स फॉर जॉब' प्रकरणाला नवे वळण; जारकीहोळींविरोधातील तक्रार घेतली मागे

नोएडातल्या सेक्टर ७८ मध्ये राहणारा संयम त्याच्या सावळ्या रंगामुळे सतत चिंतेत असायचा. काही दिवसांपूर्वीच त्याला कोणीतरी रंगावरून बोललं होतं. त्यामुळे तो तणावाखाली होता. या कारणामुळेच त्यानं आत्महत्या केली असावी, अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. संयमच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आईवडील शेतात गेलेले असताना १३ वर्षांच्या शाळकरी मुलीने गळफास घेत केली आत्महत्या

घटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी सुधीर कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, संयमचे वडील सेक्टर-१४२ मध्ये एका मोबाईल कंपनीत काम करतात. संयम त्याच्या कुटुंबासोबत महागुण मॉडर्न सोसायटीत राहायचा. अकरावीत शिकत असलेल्या संयमनं शनिवारी पहाटे ४.३० वाजता १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

पहाटे ५ वाजता सोसायटीतल्या काही व्यक्ती वॉकसाठी निघाल्या. तेव्हा त्यांनी एका मुलाचा मृतदेह पाहिला. त्यांनी याची माहिती सुरक्षा रक्षकाला दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलाची ओळख पटल्यानंतर याची माहिती त्याच्या कुटुंबाला देण्यात आली. संयमला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला होता.

संयम अतिशय हुशार विद्यार्थी होता. मात्र कोणीतरी सावळ्या रंगावरून त्याची खिल्ली उडवल्यानं गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानं याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळीदेखील तो अतिशय तणावाखाली होता. मात्र कुटुंबानं त्याची समजूत काढली. मात्र गेल्या काही दिवसांपासून संयम पुन्हा तणावाखाली गेला. त्याचं कुटुंब त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतं.

Web Title: Depressed Over His Looks 17 year old Boy Jumps to Death From 15th Floor in noida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.