बनवाबनवी करणार्या शालक-मेहुण्यास पोलीस कोठडी दोघांची सखोल चौकशी : केसरसिंगने पालघर व औरंगाबाद ग्रामीणमध्ये भरतीसाठी केला आहे अर्ज
By admin | Published: March 30, 2016 10:20 PM2016-03-30T22:20:04+5:302016-03-30T22:20:04+5:30
जळगाव : पोलीस भरती प्रक्रियेत बनवाबनवी करणार्या शालक व मेहुण्यास बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत केसरसिंग घुशिंगे याने पालघर व औरंगाबाद ग्रामीणमध्ये पोलीस भरतीचे अर्ज भरल्याची माहिती समोर आली. या दोघांना असे गैरकृत्य करण्याबाबत कोणी पूर्वकल्पना दिली, या प्रकारात एखादा अधिकारी सहभागी आहे का, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
Next
ज गाव : पोलीस भरती प्रक्रियेत बनवाबनवी करणार्या शालक व मेहुण्यास बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत केसरसिंग घुशिंगे याने पालघर व औरंगाबाद ग्रामीणमध्ये पोलीस भरतीचे अर्ज भरल्याची माहिती समोर आली. या दोघांना असे गैरकृत्य करण्याबाबत कोणी पूर्वकल्पना दिली, या प्रकारात एखादा अधिकारी सहभागी आहे का, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.संशयित आरोपी रामचंद्र कपूरचंद भवरे (२९, रा.जोडवाडी कचनेर, ता.औरंगाबाद) व केसरसिंग इंदरसिंग घुशिंगे (१९, रा.जोडवाडी, ता.औरंगाबाद) या दोघांना बुधवारी दुपारच्या सुमारास न्यायाधीश कस्तुरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांना एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड.हेमंत मेंडकी यांनी कामकाज पाहिले. आरोपींनी अजून कोणत्या ठिकाणी भरतीसाठी अर्ज केले आहेत, आरोपींना गैरप्रकार करण्यास कोणी मदत केली, दोघांच्या घरी जाऊन त्यांचे कागदपत्रे जप्त करायचे आहेत, म्हणून त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी हेमंत मेंडकी यांनी आपल्या युक्तिवादात केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.दुसर्या दिवशी कसून तपासणीभरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तोतया उमेदवार सापडल्याने दुसर्या दिवशी उमेदवारांच्या कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली. मैदानातील प्रत्येक टेबलवर कर्तव्यावर असणार्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना पोलीस अधीक्षकांकडून सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.